पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या संदर्भात दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली, तर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पीडित कुटुंबांनी काळे कपडे घालून प्रतिकात्मक निषेध नोंदवला. तृणमूलच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बैठकीसाठी १५ सदस्यीय शिष्टमंडळ भारताच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) मुख्यालयात गेले …
Read More »राहुल गांधी यांचा सवाल, महाराष्ट्रात मतदारांपेक्षा मतदान जास्त कसे पहिल्यांदाच राहुल गांधी शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे एकत्रित पत्रकार परिषदेला सामोरे
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघासह राज्यातील सर्वच मतदार संघातील निवडणूक निकालाबाबत संशय उपस्थित करण्यात येत आहे. तसेच पुर्ननिवडणूकीची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून यासंदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच भाजपाला मिळालेल्या …
Read More »१ लाख ४२७ मतदान केंद्रांवर ९ कोटी ७० लाख मतदार आपला हक्क बजाविणार मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी १,००,४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी …
Read More »मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्र स्थानांमध्ये विविध रंग संकेतन मतदान केंद्र मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त निवडणूक जिल्हा अधिकारी संजय यादव
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दहा हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र स्थानांवरील (Polling Station Location) मतदान केंद्रांवर मतदार गेल्यानंतर मतदान केंद्र शोधताना गोंधळ होऊ नये, गर्दीचे नियंत्रण व्हावे यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांकरिता विविध रंग संकेतन (Colour Coding) असलेले मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. मतदार …
Read More »मतदारानों, मतदानासाठी हे १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य मतदानाच्या दिवशी मतदान कार्ड नसेल तर हे पुरावे चालणार
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती …
Read More »पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक राज्यात ९.७ कोटी मतदार
विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ …
Read More »राज्यात विधानसभा निवडणूकीत ओबीसी मतांमधील स्पर्धा कोणाच्या पथ्यावर मराठा आणि ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर राजकिय धरिणांकडून प्रश्नचिन्ह
देशाचे पंतप्रधान तथा भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी स्वतःला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी म्हणून जाहिर केल्यानंतर राज्यातील महिला वर्गाला आरक्षण देताना आणि आणि अनेक योजना जाहिर करताना नरेंद्र मोदी यांनी सातत्याने ओबीसी मतदारांना जपण्याचे भूमिका स्विकारली. त्यातच महाराष्ट्रातही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. तर त्यांच्या भूमिकेला विरोध …
Read More »… पण महायुतीत अजित पवार यांना बाजूला काढण्याच्या प्रयत्नात शिंदे आणि भाजपा एकत्रित विधानसभेला सामोरे जाणार
राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनंतर निवडणूकीच्या प्रत्यक्ष हालचाली सुरु होतील असे सांगत निवडणूकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यभात या महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करण्याच्या …
Read More »मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी…आता कर्तव्य मुंबईकर मतदारांचे
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार आज (शनिवारी) समाप्त झाला. या निवडणूकीसाठी येत्या २० मे रोजी (सोमवारी) मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदारांना ‘आपले मत मनात नको राहायला.. विसरु नका मतदान करायला’ असे आवाहन केले आहे. गेल्या …
Read More »मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस
‘एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी २० मे २०२४ रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बस सेवचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांशी जिल्हाधिकारी …
Read More »
Marathi e-Batmya