Tag Archives: मुंबई

उच्च न्यायालयाचे मत, महिलेच्या शारीरिक स्वातंत्र्याला प्राधान्य देणे गरजेचे २८ आठवड्यांच्या पीडितेला गर्भपातास परवानगी

कथित लैंगिक अत्याचाराचा बळी ठरलेल्या १८ वर्षीय तरूणीला २८ आठवड्यांत गर्भपात कऱण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. शारिरीक स्वातंत्र्याची निवड करण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने यावेळी नमूद केले. उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी सांगितले की, बाळाला जन्म द्यायचा की नाही याची निवड कऱण्याचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा याचिकाकर्तीला अधिकार आहे. त्यामुळे तिचे स्वातंत्र्य आणि निवडीच्या …

Read More »

उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेची माहिती, १४०० कोटींचे सफाई कंत्राट रद्द निविदा प्रक्रिया रद्द करण्याची महापालिकेवर नामुष्की

झोपडपट्ट्यांतील सफाईचे कंत्राट बेरोजगारांच्या संस्थेला देण्याचे राज्य शासनाचे धोरण असताना महापालिकेने मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेऐवजी अन्य संस्थांना कंत्राट देण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या निविदा प्रक्रियेवर मागील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर निविदा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. महापालिकेने हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …

Read More »

उच्च न्यायालयात ठाणे- बोरिवली दुहेरी भूमिगत बोगदा प्रकल्पप्रकरणी सुनावणी बनावट बँक हमीच्या दाव्याचे कंपनीकडून खंडन-प्रकल्प राबवणाऱ्या कंपनीचा याचिकेला विरोध

ठाणे आणि बोरिवलीदरम्यान दुहेरी भुयारी बोगद्याच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) परदेशी बँकेचे बनावट हमीपत्र दिल्याचा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचा दावा प्रकल्पाचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला. याचिकाकर्त्यांने काही तथ्ये लपवल्याचा आरोप करून जनहित याचिका फेटाळण्याची मागणी केली. ठाणे …

Read More »

कोर्ट मार्शलचे पाच वर्ष कारावासाचे आदेश रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार लैंगिक अत्याचार प्रकरणी लष्कराच्या माजी लेफ्टनंट कर्नलची याचिका फेटाळली

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल लष्कराच्या माजी लेफ्टनंट कर्नलला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याचा कोर्ट मार्शलचा आदेश रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. उच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ मध्ये सशस्त्र दल न्यायाधिकरणाने (एएफटी) जनरल कोर्ट मार्शल द्वारे (जीसीएम) अर्जदाराला ठोठावलेल्या पाच वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका न्या. रेवती …

Read More »

मुंबई मेट्रो मार्ग- ५ च्या ठाणे- भिवंडी- कल्याणच्या कामात ३ वर्षांची दिरंगाई कामात उशीर केला म्हणून २०.८८ लाखाचा दंड -आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती

मुंबई मेट्रो मार्ग- ५ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सद्या तरी कोणतीही वाढ झाली नसली तरी ३ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा त्रासदायक आहे.आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरतेची बाब पुढे आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प …

Read More »

उच्च न्यायालयाकडून धीरज आणि कपिल वाधवान यांना जामीन येस बँक आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरणी पावणेपाच वर्षांहून अधिक काळ वाधवान बंधू अटकेत

येस बँक कर्ज घोटाळ्य़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. दोघेही दीर्घकाळ तुरुंगात असून त्यांच्याविरोधातील खटला नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने वाधवान बंधुंना जामीन मंजूर करताना नोंदवले. मागील पावणेपाच वर्षांपासून वाधवान बंधू कारागृहात आहेत. …

Read More »

बेघरांच्या नजरेतून मुंबईची टिपलेली छायाचित्रे अचंबित करणारी माय मुंबई प्रोजेक्‍ट फोटो' प्रदर्शनाचे उत्‍साहात उद्घाटन

जे स्‍वत: बेघर आहेत, अशांनी मुंबईची टीपेलेली छायाचित्रे अचंबित करणारी आहेत. समाजाने नाकारलेल्‍या बेघरांच्‍या नजरेतून मुंबईचे ख-या अर्थाने दर्शन होते, असे गौराद्गार बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. निमित्‍त होते, ‘माय मुंबई प्रोजेक्‍ट फोटो’ प्रदर्शनाच्‍या उद्घाटनाचे ! ‘पहचान’ संस्थेच्या माध्‍यमातून ५० बेघर नागरिकांना कॅमेरे देऊन, त्यांच्या दृष्टिकोनातून …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळली विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी तपासणीसाठी सीसीटीव्ही तपासण्याची मागणी करणारी याचिका

कायद्याच्या विद्यार्थ्यांना अंतिम गुणपत्रिका जारी करण्यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे बंधनकारक करणाऱ्या बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) च्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर (PIL) सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. उच्च न्यायालयात  वकील अशोक येंडे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत गोपनीयता, निष्पक्षता आणि अधिकारक्षेत्राबाबत चिंता व्यक्त करून BCI ने …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ‘मुंबई भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन

मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ‘ताज’ ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘ताज’ ग्रुपच्या बांद्रा परिसरातील नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी …

Read More »

माकपाच्या मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड झोपडपट्टीवासियांचे प्रश्न आणि मीरा भाईंदर रेल्वे प्रश्नी आवाज

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची रविवारी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी निवड करण्यात आली. माकपच्या २४ व्या मुंबई अधिवेशनात ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात ३१ सदस्यीय जिल्हा समिती निवडण्यात आली. तर मावळते सचिव डॉ. एस. के. रेगे यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे घेतली. शैलेंद्र कांबळे साधारण …

Read More »