“राज्यात वादळी वारा व गारांच्या पावसामुळे (अवकाळी) १ लाख २२ हजार हेक्टरहून ( ३ लाख ५ हजार एकर) अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करुन बाधित शेतक-यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल” अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी …
Read More »जयकुमार रावल म्हणाले, शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था
बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी …
Read More »जयंत पाटील यांचे मागणी, शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा, मदत देताना अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जयंत पाटील यांची मागणी
संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मदत देताना कोणत्याही प्रकारची अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील म्हणाले की, उभ्या पिकांचे, फळबागांचे तसेच काढणीस …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, पिंपळगाव बसवंत येथे किटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळा प्रयोगशाळा स्थापनेतील अडचणींचा आढावा
नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात द्राक्ष, बेदाणे, डाळिंब, टोमॅटो आणि कांदा या निर्यातक्षम पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पिंपळगाव बसवंत हे या उत्पादन पट्ट्याच्या मध्यभागी असून द्राक्ष निर्यातदारांचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. सध्या येथील शेतकरी आणि निर्यातदारांना किटकनाशक अवशेष तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत असल्याने येथे किटकनाशक अवशेष चाचणी …
Read More »७.५ एचपी वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही केवळ ७.५ हॉर्सपॉवरपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू आहे. शेतकरी ग्राहकांनी आवश्यक उपाययोजना करून वीज वापर ७.५ हॉर्सपॉवरच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कृषी पंपधारक शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपासून …
Read More »डॉ पंकज भोयर यांची ग्वाही, किडनी घोटाळ्यातील आरोपींना मोक्का लावणार बेकायदेशीर सावकारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्यास भाग पाडल्याच्या खळबळजनक प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. या गंभीर घटनेनंतर, राज्य सरकारने बेकायदेशीर सावकारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे आणि आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागू करण्याची आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या …
Read More »“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून, समान वेतन, कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करा एआय अॅग्री २०२६ परिषदेत तज्ञांची शिफारस
शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी ठरत असतानाच, या तंत्रज्ञानात लिंग-संवेदनशीलता जपणे अत्यावश्यक आहे. महिलांना कृषी नवोपक्रमात समान भागीदार म्हणून मान्यता दिली पाहिजे.महिलांची डिजिटल साक्षरता वाढवली पाहिजे. “शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करण्याची, समान वेतन सुनिश्चित करण्याची आणि महिलांसाठी अनुकूल कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करून देण्याची शिफारस करावी, असे मत नामवंत …
Read More »कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकरी हाच तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू कृषी क्षेत्रातील एआय अॅप्सचे लोकार्पण व सामंजस्य करार
आजचा काळ तंत्रज्ञानाचा असला तरी कृषी क्षेत्राच्या तंत्रज्ञानात शेतकरी हाच केंद्रबिंदू असला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, आयओटी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडल्यास महाराष्ट्राची शेती देशासह जगासाठी आदर्श ठरू शकते, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्राने २०२५ ते २०२९ या …
Read More »राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापारी करारावरून पंतप्रधान मोदींना विचारले पाच प्रश्न व्यापारी करारावरून केंद्र सरकारवर केली टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारावरून केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आणि पुन्हा एकदा म्हटले की ते भारतीय शेतकऱ्यांना “विश्वासघात” करू शकते आणि देशाच्या कृषी सार्वभौमत्वाशी तडजोड करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच विशिष्ट प्रश्न उपस्थित करत त्यांनी अनुवांशिकरित्या सुधारित पिके, व्यापार नसलेले अडथळे दूर करणे आणि …
Read More »केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पलटवार, राहुल गांधी यांचे आरोप निराधार अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित पूर्णतः सुरक्षित
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित पूर्णतः सुरक्षित आहे. राहुल गांधी हे सातत्याने खोटे, निराधार आरोप करत असतात. या कराराबाबतही ते फेक नरेटिव्ह पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी केली. दिल्लीत एका कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते. पियुष गोयल पुढे बोलताना …
Read More »
Marathi e-Batmya