Tag Archives: संजय गायकवाड

संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदेंकडून कडक शब्दांत समज रितसर तक्रार करता आली असती, मारहाणीचे समर्थन करणार नाही

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना समज दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आमदार संजय गायकवाडला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो? मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने महाराष्ट्र धर्म जागवावा

आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिल्याच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आमदार संजय गायकवाड यांच्यावर …

Read More »

आमदार संजय गायकवाड यांचा वेटरला मारहाण करताचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री म्हणाले… विधिमंडळात व्हिडिओतील आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीचे पडसाद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओत संजय गायकवाड यांच्याकडून आकाशवाणी आमदार निवासातील एका वेटरला मारहाण करतानाचे त्यात दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधिमंडळात उमटले असून त्यावर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली आहे. यासंदर्भात संजय …

Read More »

नाना पटोले यांची माहिती, राहुल गांधीना धमक्या देणाऱ्या भाजपाच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर इजा पोहेचवण्याच्या धमक्या देणा-यांवर कठोर कारवाई करा

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधांना पत्र लिहिले आहे. पण अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही. एकनाथ शिंदेचा …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल, हिंदू-मुस्लिम प्रमाणेच मराठा आणि ओबीसी समाजात…

विद्यमान सरकारकडून ज्या प्रकारे हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजांमध्ये ज्या प्रमाणात वाद निर्माण करून वेगवेगळे केले आहे त्याचप्रमाणे सरकारकडून मराठा आणि ओबीसी यांना वेगवेगळे करण्याचं काम करत आहे याचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, भुजबळांची सरकारने माफी मागावी, संजय गायकवाडांना निलंबत करा

राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल ज्या पद्धतीने अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरण्यात आली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले भुजबळ हे मागासवर्गीय समाजाचे आहेत म्हणूनच त्यांच्याबद्दल शिविगाळ करणारी भाषा वापरण्यात आली आहे, ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. भुजबळांबद्दल जी भाषा वापरली त्याबद्दल सरकारने माफी मागावी …

Read More »