हे सरकार जैन समाजाची फसवणूक करत आहे,महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाद निर्माण केले जात आहेत राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट VVPAT मशीन नसणार अस राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी कारण दिले जात आहे की एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार, त्यामुळे …
Read More »राज ठाकरे यांचे आवाहन, मी आणि उद्धव एकत्र येऊ शकतो तर… निवडणूकीच्या कामाला लागा, युतीचा निर्णय मी घेणार
मराठीच्या मुद्यावरून एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना एक संदेश देताना म्हणाले की, त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या
साधारणतः वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत चार महिन्यात महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीबाबत निकाल दिला होता. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावत २०१८ च्या स्थितीनुसार ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा निर्णयावर …
Read More »स्थानिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची युती शिवसेना व रिपब्लिकन सेना यांची युती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवा भिडू मिळाला आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटासोबत प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती यापुर्वीच झाली असून आता आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना पक्षासोबत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आज या …
Read More »राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले, ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण पंचायत राज विभागाच्यावतीने पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले महत्व अधोरेखित
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या संस्थांनी मोठे योगदान दिले असून राज्यात पंतप्रधान आवास योजना व इतर गृहनिर्माण योजनेंतर्गत लाखो नव्या घरांच्या बांधकामास मान्यता मिळालेली आहे. ही गोष्ट अत्यंत समाधानकारक असून मनरेगा, जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान यासह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी …
Read More »जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत, वाढता वाढता वाढे निवडणूकीची अद्याप चर्चा नाही पण जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीत वाढ
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप त्या अनुषंगाने पुढील कारवाईला सुरुवात केली नाही की, राज्याच्या मुख्य सचिवांकडून यासंदर्भात पत्रक जारी केले नाही. असे असताना राज्य सरकारने सुरु केलेली मुदत वाढीचे शेपूट आता थेट वर्षाच्या …
Read More »राज्यातील ५८ शहर-जिल्ह्यासाठी भाजपाकडून अध्यक्षांची नियुक्ती प्रदेश निवडणूक अधिकारी भाजपा आमदार चैनसुख संचेती यांच्या सहीने यादी जाहिर
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आदेश दिले. तसेच याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्या असे आदेशही यावेळी दिले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५८ शहरे-जिल्ह्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती भाजपाने जाहिर केली आहे. भाजपा नेते आणि आमदार चैनसुख संचेती यांच्या सहीने या अध्यक्षांची …
Read More »राज्यातील ९५% स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास होतील
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत राज्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या …
Read More »जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले मनापासून आभार लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल आभार मानले
गेली ३ वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या नव्हत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली ३ वर्षे प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत, ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांची घोषणा एक महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणुका प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा अंतरिम आदेश दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्या विद्यमान आरक्षणासह निवडणूका घेण्याचे राज्य सरकारला आदेश
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (६ मे) महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अंतरिम आदेश दिला, ज्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित खटल्यांमुळे २०२२ पासून रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०२२ मध्ये बांठिया आयोगाचा अहवाल सादर करण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. “जे के …
Read More »
Marathi e-Batmya