पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत …
Read More »हिंदी चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,…हि तर सत्तेसाठी अजित पवार यांची लाचारी अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला, मुस्लीम समाजाचा केला विश्वासघात
भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकार मध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजपा सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याचा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे ‘जिल्हा नियोजन’मधून निधी मिळणाऱ्या कार्यालयांना इमारतींच्या सौर ऊर्जीकरणाचे निर्देश
राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘ जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी २२ विभागांच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून विशेष पॅकेज आणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आश्वासनांची खैरात करणाऱ्या महायुतीचा ‘गजनी’ झाला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय गडचिरोलीत खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यास मंजूरी
अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत गडचिरोलीत खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्याबरोबरच वडसा-देसाईगंज- गडचिरोली रेल्वे मार्गासाठी निधी, बीड जिल्ह्यातील ब्रम्हनाथ येळंब आणि टाकळगांव हिंगणी, निमगांव, येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यास मंजूरी आणि यासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ …
Read More »अंबादास दानवे यांची टीका, सरकार अदानीचे कर्ज माफ करू शकते पण शेतकऱ्यांचे नाही निवडणूकीतील आश्वासन पूर्ण करू शकत नाही
पीक कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय धुमाकूळ सुरू झाला आहे. अजित पवार यांच्या विधानाला महायुतीतील मित्रपक्षांकडून पाठिशी घालण्याचा प्रयत्न सुरु केला असताना , शिवसेना उबाठाने मात्र अजित पवार यांच्या वक्तव्याचा विरोध करत, महायुती सरकारने खोटी निवडणूक आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. बारामतीतील एका कार्यक्रमात …
Read More »सुनिल तटकरे यांचे आवाहन, सद्भावनेची गुढी उभारूया… आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊया
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यंदाचा गुढीपाडवा आपण एका नव्या संकल्पाने ‘सद्भावनेची गुढी’ उभारून साजरा करावा असे आवाहन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले आहे. तसेच सुनिल तटकरे पुढे म्हणाले की, जातीधर्मांत निर्माण झालेले अंतर हे आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि वैभवशाली परंपरेशी सुसंगत नाही. म्हणूनच, यंदाच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कर्जमाफी मिळणार नाही ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ भाजपा युती सरकारकडून शेतकरी व लाडक्या बहिणींची घोर फसवणूक, मते घेऊन सत्तेत आले आणि विसरले
जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या …
Read More »महाराष्ट्र बदलाची सुरुवात मंत्रालयापासूनः चार दिवसानंतर मंत्रालयात आले पाणी महायुती सरकारला मोठा जनाधार सरकारच्या विरोधात बोलू तर भलतीच कारवाई होईल म्हणून अधिकारी चिडीचूप
राज्यात महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आता महाराष्ट्र बदलणार, विकासाच्या वाटेवर चालणार म्हणून भला मोठा बँनर शपथविधीच्या ठिकाणी लावला. त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्र आता बदल्याशिवाय राहणार नाही, विकासाच्या वाटेवर चालल्याशिवाय राहणार नाही …
Read More »
Marathi e-Batmya