सुनिल तटकरे यांचे आवाहन, सद्‍भावनेची गुढी उभारूया… आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊया

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यंदाचा गुढीपाडवा आपण एका नव्या संकल्पाने ‘सद्‍भावनेची गुढी’ उभारून साजरा करावा असे आवाहन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले आहे. तसेच सुनिल तटकरे पुढे म्हणाले की, जातीधर्मांत निर्माण झालेले अंतर हे आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि वैभवशाली परंपरेशी सुसंगत नाही. म्हणूनच, यंदाच्या गुढीपाडव्याला आपण सद्‍भावनेचा संकल्प करणार आहोत असेही सांगितले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, आज आपला शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र पुढे घेऊन जात समाजा समाजात, जातीधर्मांत अकारण जो दुरावा दिसत आहे तो मिटवण्याचा नवसंकल्प आपण यंदा ही सद्‍भावनेची गुढी उभारताना करूया. आपल्या महाराष्ट्रात सदैव सर्व जाती धर्म पंथ गुण्यागोविंदाने नांदले आहेत. हीच समृद्ध परंपरा आता आपल्याला पुढे न्यायची आहे”, असेही यावेळी सांगितले.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, तसेच, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी इस्लाम धर्मातील पवित्र मानला जाणारा आणि सद्‍भावनेचे प्रतीक असणारा ईद उल फित्र देखील येत आहे. एकता, बंधूभाव आणि सद्‍भाव जपणाऱ्या या दोन्ही सणांच्या निमित्ताने आपण उत्साहाची, सद्‍भावनेची गुढी उभारूया आणि आनंदाने व सद्‍भावनेने गळाभेट घेऊया”, असे आवाहनही यावेळी केले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, गुढीपाडव्याच्या मंगलदिनी घराघरात उभारली जाणारी गुढी केवळ विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक नसते तर ते संस्कृती, परंपरा आणि नवचैतन्याचे द्योतक असते. ही संस्कृती अन् सद्‍भावना आपल्याला सदैव जपायची आहे. येणारा प्रत्येक दिवस हा फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिल असा मानस आपण सर्वांनी एकत्र येत ठेऊया, असे आवाहन यावेळी राज्यातील जनतेला केले.

About Editor

Check Also

सचिन सावंत यांचा सवाल, महाराष्ट्रात एमएसआरटीसीचे विलिनीकरण कधी करणार? तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय, मविआ सरकार असताना एसटीच्या विलिनिकरणाच्या बाता मारणारे भाजपाधार्जिणे नेते आता गप्प का?

काँग्रेसच्या तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *