मुंबई : प्रतिनिधी सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे …
Read More »मूळ गावी गेलेला तो परत येतोय, राज्यात…पण क्वारंटाईन होवून सर्व कामगारांची नोंद, थर्मल तपासणी : गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई: प्रतिनिधी लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद, थर्मल तपासणी करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता …
Read More »बन्सोड हत्याप्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करावा आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न असल्याचा माजी मंत्री बडोले यांचा आरोप
नागपूर : प्रतिनिधी राजकीय दबावामुळे जलालखेडा पोलिसांनीआरोपींच्या विरोधात अँट्रासिटीतंर्गत गुन्हा नोंदविण्यास विलंब करत आरोपींना पळून जाण्यास मदत केली. या आरोपी व ठाणेदाराने संगनमताने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाणेदाराच्या विरोधातही गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी करत सदर प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी …
Read More »अरविंद बन्सोड हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
पुणे: प्रतिनिधी अरविंद बनसोड याची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागपूर, थंडीपवनी येथे अरविंद बनसोड याची हत्या करण्यात आली होती. २७ मे रोजी …
Read More »गृहमंत्र्यांनी साजरा केला बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस किवळे फाटा येथे वाढदिवस केला साजरा
मुंबई: प्रतिनिधी गृहमंत्री अनिल देशमुख काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सळाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी थोडा वेळ थांबून संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याची माहिती घेतली. तसेच अडीअडचणी बाबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांना समजले …
Read More »सावधान ! Mont Blanc वेबसाईटवरून मेसेज आलाय? लॉकडाऊनच्या काळात ४०४ गुन्हे दाखल, २१३ जणांना अटक
मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. सध्या Mont Blanc नावाच्या नकली वेबसाईट संदर्भात आर्थिक फसवणूकीच्या बऱ्याच तक्रारी येत आहेत .त्यापासून सावध राहावे. असे आवाहन सायबर विभागाने केले आहे. तसेच राज्यात सायबर संदर्भात ४०४ गुन्हे …
Read More »अन्नधान्याची गरज आणि आर्थिक संकटातून मुक्तीसाठी आता कृषी क्षेत्रावरच भिस्त राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने पुढील काळासाठी कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले तर कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »मंत्रालयातील १५०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना नेमले पोलिसांच्या मदतीला ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर, पुणे महानगरातून स्थलांतरीत मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या मजूरांच्या पाठविणीसाठी पोलिस यंत्रणेकडे आणि राज्य सरकारच्या कंट्रोल रूमकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या कामगारांना पाठविण्याच्या कामात अडचणी येत होते. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने अखेर मंत्रालयातील ४० वर्षाच्या आतील १४२१ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. …
Read More »आयएएस, आयपीएस, राजपत्रित अ-बचे दोन तर क-ड चा एक दिवसाचा पगार कोविडसाठी हरकत असतील त्यांनी तात्काळ तक्रार नोंदविण्याचे आदेश
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेतील आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, राजपत्रित अ-ब वर्गातील अधिकाऱ्यांचा दोन दिवसाचे वेतन तर क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कोविड विरोधी लढ्यासाठी वेतनातून कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या वेतन कपातीस कोणाची हरकत असेल तर त्यांनी तातडीने तसेच संबधित विभागाच्या …
Read More »वाधवानप्रकरणातील वादग्रस्त अधिकारी अमिताभ गुप्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना पाठविण्याऱ्या समितीचे प्रमुख
मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे प्रमुख वाधवान यांना खास पत्र देत महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्याचे पत्र देत संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आयपीएस अधिकारीअमिताभ गुप्ता यांनाच आता राज्य सरकारने पुन्हा एका समितीचे प्रमुख पद दिले. विशेष म्हणजे राज्यातील स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरून त्यांच्या मूळ गावी …
Read More »
Marathi e-Batmya