Tag Archives: ashish shelar

राज ठाकरेंना पडला प्रश्न सततच्या पराभवातून आलेली उद्विग्नता पडली बाहेर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात स्पष्ट वक्ता, अचूक टायमिंग साधणारा नेता म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ओळख आहे. मात्र गेल्या ९ वर्षापासून राज ठाकरे अर्थात मनसे पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांमध्ये सपाटून मार खावा लागत आहे. त्यामुळे या पराभवाबद्दलची उद्विग्नता पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी व्यक्त करत मतदानाच्यावेळी लोक जातात …

Read More »

मुंबई महानगरात दोन वर्षात ३० हजार घरे बांधणार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसात मुंबईत १ लाख ५६ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. ही घरे सर्वसामान्य जनतेला परवडणारी नसल्याने विनाविक्री पडून आहेत. तसेच बाजारात मंदी आहे. मात्र आता काही नव्याने धोरण स्विकारत १ मे पूर्वी अर्थात महाराष्ट्र ६१ वर्षात पदार्पण करण्याच्या आधी मुंबईत परवडणाऱ्या दरातील ३० हजार घर …

Read More »

कायम विना अनुदानित शाळांची तपासणी वित्त,शिक्षण विभाग करणार मंत्री वर्षा गायकवाडांना उपमुख्यमंत्र्यांची मदत

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कायम विना अनुदानित शाळांना पुन्हा अनुदान देण्याचा निर्णय २०१६ साली घेण्यात आला. मात्र अनुदान देताना या शाळांची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे यां शाळांची शालेय शिक्षण विभागाबरोबरच वित्त विभागाकडून तपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. …

Read More »

गेल्या वर्षभरात मुंबईतील १४०२ बालकांनी गमावला प्राण तर राज्यात १३ हजार ७० बालकांचा मृत्यू

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील नवजात बालमृत्यूच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी सरकार आणि विविध सामाजिक संघटनाकडून प्रयत्न करण्यात येतात. तरीही बालमृत्यूच्या संख्येत वाढच होत असून गेल्यावर्षी तब्बल १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाला तर मुंबईत १ हजार ४०२ बालमृत्यू झाल्याचे एच.एम.आय.एस. च्या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेत उघडकीस आली. …

Read More »

शेलारांच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कान बधीर झाले विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोक प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. परंतु माईकमधून बोलण्यास सुरुवात करूनही त्यांचा आवाज कमी यायला लागल्याने विरोधकांनी इशाऱ्याने मोठ्याने बोला असे सुचविले. त्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आवाजाने माझे …

Read More »

हेगडेंच्या त्या वक्तव्यप्रकरणी भाजपा नेत्यांनीच माफी मागावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपा व संघ परिवाराकडून महात्मा गांधींबद्दल वारंवार अशी अपमानजनक वक्तवे केली जात असताना त्यांना भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व पाठीशीच घालत असल्याचे दिसते. हेगडेंचे आजचे वक्तव्यही संतापजनक आणि निषेधार्ह आहे. या वक्तव्यप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माफी …

Read More »

बातमीचा फलक मुख्यमंत्र्यांसमोर फडकाविल्याने भाजपा-शिवसेनेच्या आमदारात धक्काबुक्की विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सत्ताधारी-विरोधकांना समज

नागपूरः विशेष प्रतिनिधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरून भाजपाने आज दुसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई २५ हजाराची द्यावी अशी मागणी करत होते. यावेळी भाजपाचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोरील मोकळ्याजागेत बातमीचा फलक फडकाविण्याचा प्रयत्नास शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, …

Read More »

मंत्री, राज्यमंत्र्यांनो संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत कार्यालये खाली करा सामान्य प्रशासन विभागाचे मंत्रिमंडळ कार्यालयांना आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयासह सर्व मंत्री, राज्यमंत्र्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने या सर्वांनी आपापली कार्यालये १३ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत रिकामी करावीत असे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन …

Read More »

पारदर्शक मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना लागली गोडी भूखंडाच्या श्रीखंडाची प.दिनदयाल सेवाभावी संस्थेला मुंबईतील १२०० चौ.मीटरची जागा

मुंबईः खास प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या अर्थात राज्य सरकारच्या मालकीचा भूखंड पत्नीसाठी तिरूपती देवस्थानला देण्याचा प्रताप नुकताच उघडकीस आला. आता त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थापन केलेल्या पंडीत दिनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेस भूखंडाचे श्रीखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी महसूल आणि शिक्षण विभागाने फारच सोपस्कार …

Read More »

विश्वचषकापर्यंत धडक मारणाऱ्या दिव्यांग क्रिकेट टीमचा कप्तान केणीचा सत्कार करा आमदार अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी दिव्यांग क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाला विजेते पद मिळवून भारतीय टीमचा कर्णधार विक्रांत केणीचा राज्य शासनातर्फे जाहीर सत्कार करण्यात यावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य क्रीडा मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या हुरहुन्नरी क्रिकेटपटूच्या कामगिरीची दखल घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्याचे …

Read More »