मुंबईः प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयासह सर्व मंत्री, राज्यमंत्र्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने या सर्वांनी आपापली कार्यालये १३ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत रिकामी करावीत असे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्री, राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांना बजावले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा कार्यकाल संपुष्टात आला. त्यामुळे या कार्यालयातील सर्व फाईली मुळ विभागाकडे हस्तांतरीत करावेत असे आदेश देत कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनाही मुळ विभागात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे प्रवास भत्त्याची देयके, त्याची बीले यांची सविस्तर माहिती संबधित विभागास पाठवून देण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहे. विशेष म्हणजे यासर्वांची कार्यवाही पूर्ण करून त्याचा ताबा संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सामान्य प्रशासनाकडे द्यावी अशी स्पष्ट आदेशही देण्यात आले आहे.



Marathi e-Batmya