सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२२ सप्टेंबर २०२५) २०२० च्या दिल्ली दंगलीशी संबंधित मोठ्या कट रचल्याप्रकरणी उमर खालिद, शर्जील इमाम, गुल्फिशा फातिमा, मीरान हैदर आणि शिफा उर रहमान या कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली …
Read More »सैफ अली खान प्रकरणी पोलिसांचा आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध घटनास्थळी सापडलेल्या तुकड्य़ासह अन्य चाकुच्या तुकड्यात साम्य
अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यामध्ये त्याच्या मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा, घटनास्थळी सापडलेला एक तुकडा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामकडून हस्तगत केलेल्या शस्त्राशी जुळत आहेत. हे तीन तुकडे अभिनेत्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या शस्त्राचा भाग होते, असे पोलिसांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात सांगितले. तसेच पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला. तिन्ही तुकडे मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये सीए (रासायनिक विश्लेषण) तपासणीसाठी पाठवण्यात आले. एफएसएल …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच ठोठावला दोन लाखांचा दंड अटकपूर्व जामीनाचा अर्ज मागे घेऊनही त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याबद्दल व्यक्त केली चिंता
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एका याचिकाकर्त्यावर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, ज्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी उच्च न्यायालयात दोनदा आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. खंडपीठाने असे नमूद केले की, उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व …
Read More »कुर्ला बस दुर्घटना प्रकऱण: आरोपी संजय मोरेचा जामीनासाठी अर्ज पोलिसांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मागितला वेळ
कुर्ला परिसरात झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे यांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अपघातामध्ये आपला कोणताही दोष नसल्याचा दावाही मोरे यांनी केला असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा अर्जातून केला आहे. या प्रकरणावर सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार …
Read More »जयदीप आपटे आणि डॉ चेतन पाटील यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयातच सुनावणी मालवण येथील शिवपुतळा दुर्घटना
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात नुकतेच आरोपपत्र दाखल झाले असून दोघांनीही कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी दाद मागावी, असे राज्य सरकारकडून मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. परंतु, न्यायालयाने दोघांच्या जामिनासाठीच्या याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आणि आरोपपत्राची पत्र सादर …
Read More »मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकऱण शिल्पकार जयदीप आपटेची उच्च न्यायालयात धाव मंगळवारी होणार सुनावणी
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे (३९) यांनी जामीनासाठी उच्च न्यायासयात धाव घेतली आहे.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कांस्य पुतळा पडल्याचा दावा आपटे यांनी याचिकेतून केला असून याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्यावर्षी ४ डिसेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ फुटांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya