बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारावरून निर्माण झालेला गोंधळ बुधवारी दूर झाला. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये आयएएस अधिकारी आशिष शर्मा यांच्या नियुक्तीचा आदेश …
Read More »सलग तिसऱ्यांदा नगरसेवकांशिवाय मुंबई महापालिकेचा ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर पालिकेचा १६ हजार कोटींच्या एफडीवर डल्ला गतवर्षाच्या तुलनेत १४ हजार कोटींची वाढ
मागील तीन वर्षापासून नगरसेवकांशिवाय मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या मार्फत राज्य सरकारकडून हाकला जात असून प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेचा ७४ हजार ४२७ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या प्रशासकाने बँकांमध्ये ठेवलेल्या १६ हजार ६९९.७८ कोटी रूपयांच्या ठेवींवर डल्ला मारत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुंबई …
Read More »बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाचा विरोध आदित्य ठाकरे यांचे मुंबई पालिका आयुक्तांना पत्र
मुंबईतील मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बेस्ट बसकडून दर भाडेवाढीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या अनुषंगाने बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाने विरोध केला असून मुंबईतील बस सेवा पुन्हा एकदा कोलमडून पडण्याच्या स्थिती असल्याचे सांगत मुंबईकरांना त्रास होऊ नये आणि बेस्टला आर्थिक निधी द्यावा यासाठी शिवेसना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे …
Read More »उदय सामंत म्हणाले, २०२७ पर्यंत बेस्ट उपक्रमात संपूर्ण बसगाड्या इलेक्ट्रिक
प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातील संपूर्ण बसताफा हा सन २०२७ पर्यंत इलेक्ट्रिकवर करण्याचे प्रस्तावित करण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. बेस्ट बससेवेसंदर्भात सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना उदय सामंत बोलत होते. मंत्री उदय सामंत म्हणाले की, बेस्ट उपक्रमामार्फत सद्य:स्थितीत २१०० एकमजली व …
Read More »पुढील २४ ते ४८ तासात बेस्ट ची सेवा पूर्ववत होणार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपवार पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन
बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी परिवहनचे प्रधान सचिव पराग जैन, बीईएसटीचे आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०५२ बसेस आहेत. …
Read More »कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांची थकीत पीएफ रक्कम जमा न केल्यास थेट बेस्टवर कारवाई करा कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांचे आदेश
नियुक्त कंत्राटदारांने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या पीएफ-भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी आज येथे दिले. मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट), व्यवस्थापनेचे …
Read More »बेस्टमधील कंत्राटी कामगारांच्या थकित मानधनाबाबत त्वरित चौकशी करण्याचे आदेश कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिले आदेश
कोविड काळात बेस्टच्या कंत्राटी वाहनचालकांचे आणि कामगारांचे वेतन कंत्राटदाराकडून करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे कामगारांचे भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी विमा निगमचे हप्ते भरण्यात आले नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत चौकशी करून याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बृहन्मुंबई …
Read More »या कारणासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची झाली बत्तीगुल २० मिनिटासाठी मंत्रालय राहिले वीजेविना
मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्लॅकआऊटची घटना ताजी असताना आज मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची वीज तब्बल २० मिनीटसाठी खंडित झाली. त्यामुळे मंत्रालयात आलेल्या काही मंत्र्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना काळोखात राहण्याची वेळ आली. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक विभागांना आपली कामे करता आली नाहीत. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे वीज खंडीत झाल्याची माहिती मंत्रालयातील वीज …
Read More »शेलार म्हणाले, बेस्टच्या थकबाकीदार बिल्डरांची एसआयटी मार्फत चौकशी करा भाजपा आमदारांची आक्रमक भूमिका तर मंत्र्यांची सावध भूमिका
मुंबईः प्रतिनिधी आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाची बिल्डरकडे गेले १३ वर्षे असलेल्या थकबाकी आणि त्यात होत असलेल्या विलंबाबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा अशी आग्रही मागणी भाजपा आमदारांनी विधानसभेत आज केली. बेस्ट उपक्रमाच्या डेपोंचा व्यावसायिक वापर करण्यासाठी विकासकांना देण्यात आले. यावेळी झालेल्या करारानुसार बेस्टला देय्य असलेल्या रकमेपैकी ३२० कोटी बिल्डरकडे थकित असल्याचे तारांकित …
Read More »दोन तासाच्या बत्तीगुलनंतर मुंबईतला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी शहराला आणि उपनगरीय रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटाच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने जवळपास दोन तास मुंबई शहराबरोबर उपनगरातील वीज पुरवठा ठप्प झाला. तसेच उपनगरीय रेल्वे वाहतूकही ठप्प झाल्याने मुंबई पूर्णपणे थांबल्याचे चित्र आज अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच झाल्याचे दिसून आले. दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत …
Read More »
Marathi e-Batmya