Tag Archives: bmc

मुंबई आणि परिसरात पडणाऱ्या पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई व परिसरात  सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. कालपासून  जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी …

Read More »

भानुशाली दुर्घटनेतील मृतकांच्या वारसांना ५ लाख: कंत्राटदाराची जबाबदारी तर जखमींना ५० हजाराची म्हाडाकडून जाहीर

मुंबई: प्रतिनिधी शहराच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या फोर्टमधील भानुशाली इमारतीचा भाग कोसळून ६ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीररित्या जखमी झाले असून १८ रहिवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आले. यापैकी मृतकांच्या वारसांना ५ लाखाची मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार आणि किरकोळरित्या जखमी झालेल्यांना २५ हजार रूपयांची तातडीने मदत …

Read More »

शाब्बास धारावी ! कोरोना विरोधी लढ्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल

मुंबई: प्रतिनिधी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज …

Read More »

पावसाळी साथ आजाराचा मुकाबला करत कोरोनाचे ट्रॅकींग- टेस्टींग ही वाढवा यंत्रणांनी समन्वयातून काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे …

Read More »

मुंबईतल्या गटारी, नद्यांमधील पाण्याची हालचाल आणि पूराची पूर्वसूचना मिळणार एकात्मिक पूर यंत्रणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी मान्सून काळात एकात्मिक पूर इशारा यंत्रणा (इं‍टिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम) ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पुर येणार आहे तसेच अगदी वादळासारख्या संकटाची देखील पूर्व सूचना मिळून सावध होता येणार आहे. या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या …

Read More »

खाजगी रूग्णालयानों रूग्णांना बेड नाकारताय, BMC वॉच करतेय पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना उपाययोजनांवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या ८० टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही असे पाहावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले. तर …

Read More »

मुंबईच्या रूग्णालयातील बेड्सची संख्या पुढील आठवड्यापासून ऑनलाईन महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाग्रस्त रूग्णांना वेळेत रूग्णालयात खाट न मिळाल्याने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर लक्षण दिसायला लागल्यानंतर सदर व्यक्तीला तातडीने रूग्णालयात दाखल करता यावे यासाठी मुंबईतील सर्व रूग्णालयातील खाटांची अर्थात बेडची संख्या पुढील आठवड्यापासून ऑनलाईन उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. …

Read More »

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे झाले बाकीच्या ६ विभागाचे काय? कोरोना योध्दे अथवा इतर कमी पडत असलेल्या ठिकाणी या विभागातील अधिकाऱ्यांनाही पाठवा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना युध्दात सध्या मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांसहित बिगर अत्यावश्यक सेवांमधील कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी आणि पोलिस दलातील कर्मचारीही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यातील पोलिसांच्या मदतीसाठी मंत्रालयातील १४२१ कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या दिमतीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र विक्री कर, रेशनिंग ऑफिस, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयानों या गोष्टी करा अधिकारी कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क देण्याची सूचना

 मुंबई : प्रतिनिधी खाजगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली असून त्यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने काळजी …

Read More »

आता आठवड्यातील फक्त दोनच दिवस भाजीपाल्याची दुकाने मुंबई महापालिकेकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडा अशी विनंती करूनही अनेकजण भाजीपाला-फळे खरेदीच्या निमित्ताने घराबाहेरच राहुन गर्दी करत आहेत. त्यामुळे या वाढणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्याच्या अनुषंगाने इथून पुढे आढवड्यातील दोनच दिवस भाजीपाला-फळभाजा खरेदीसाठी दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जारी केला …

Read More »