Tag Archives: bmc

नाना पटोले यांचा सवाल, धारावी पुनर्विकास की देवनार २३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा? लाडक्या उद्योगपतीसाठी राज्य सरकार व बीएमसीकडून पायघड्या, घरे अदानी बांधणार, बीएमसी जागा मोकळी करून देणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई महापालिकेवर २३६८ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक भार टाकण्यात आला आहे. प्रकल्पातून अपात्र ठरणाऱ्या धारावीतील नागरिकांना “रेंटल हाउसिंग”मध्ये स्थलांतरित करण्यात येणार असून, यासाठी अदानी धारावी पुनर्विकास प्रा. लि. तब्बल ५०,००० घरे उभारणार आहे. मात्र ही घरे बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून देवनार डम्पिंग ग्राउंड खाली करण्याचा प्रस्ताव …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, आरोग्य विभागाचा ७ हजार कोटींचा निधी जातो कुठे ? नालेसफाईत हातसफाई, मिठी नदीत अजून गाळ तसाच, मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? …

Read More »

आशिष शेलार यांचे आदेश, सर्व यंत्रणांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी काम करा मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीत दिले प्रशासनाला आदेश

जिल्हा नियोजन समिती ही एक महत्त्वाची समिती असून या समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेले प्रश्न हे जनतेच्या हिताचे असतात. तसेच शासनाचा निधी जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्याची जबाबदारी कार्यान्वयीन यंत्रणांवर असते. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी या बैठकीमध्ये मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच अधिकारी वर्गाने प्रयत्न …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, उबाठाकडून मुंबईकरांशी १ लाख कोटींची बेईमानी मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी

गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे १ लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी करत ही १ लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा यंदाही मुंबईत मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी एसीबी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक

मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, जैन मंदिराच्या उर्वरित बांधकामावर कारवााई नको महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

विर्लेपार्ल्यातील जैन मंदिराचे उर्वरित बांधकामावर पाडकाम कारवाई करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच मुंबई महानगरपालिकेला दिले. श्री १००८ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने महानगरपालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ट्रस्टने महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात दोन अपील दाखल केली असून न्या. गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे त्यावर नुकतीच सुनावणी झाली. …

Read More »

शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाची मागणी, भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नका शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट, पालिका आयुक्तांनी दाखवला सकारात्मक प्रतिसाद

बोरिवली येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नये तसेच पालिकेतर्फेच अद्यावत आणि सुसज्ज असे ९ मजल्यांचे ४९०खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या …

Read More »

रेल्वेच्या जमिनीवर ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी बसविल्या? पालिकेकडे माहिती नाहीः मध्य आणि पश्चिम रेल्वेत होर्डिंग्ज माफिया

मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती …

Read More »

मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती, बोलार्ड्स काढून टाकणार सु मोटो याचिकेवरील सुनावणी दरम्यान बीएमसीची माहिती

बोलार्ड्स मुळे मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना फूटपाथवर जाता येत नसल्याबद्दल स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या संदर्भात, मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मंगळवारी (१ एप्रिल) उच्च न्यायालयाला माहिती दिली की त्यांनी फूटपाथच्या प्रवेशद्वारावरून सर्व बोलोर्ड्स काढून टाकणार असल्याचे सांगितले. २०२३ मध्ये, जन्मापासूनच व्हीलचेअर वापरणारे करण सुनील शाह यांनी वकील जमशेद मिस्त्री यांना पाठवलेल्या ईमेलच्या …

Read More »