एखाद्या जमीन मालकाला मालमत्तेच्या मौल्यवान अधिकारापासून वंचित ठेऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील अशोक आणि अतुल पुराणिक या दोन भावांच्या भूसंपादन कायद्यांतर्गत संपादित केलेल्या जमिनीची उर्वरित नुकसान भरपाईही सहा आठवड्यांत देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. मालमत्तेचा अधिकार घटनात्मक अधिकार आहे. परंतु, एका कुटुंबातील मालमत्तेच्या …
Read More »इंडिगोच्या कर्मचाऱ्याच्या विरोधातील विनयभंगाचा गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द इंडिगो एअरलाइन्सच्या सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्धचा दाखल होता गुन्हा
महिला प्रवाशाच्या हातातील पिशवी हिसकावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सच्या सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्ध दाखल गुन्हा उच्च न्यायालय़ाने नुकताच रद्द केला. उच्च न्यायालयाने या प्रकरणी मत व्यक्त करताना भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार, कोणत्याही महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळाचा वापर करण्याचा संबंधित व्यक्तीचा (पुरुष) हेतू असणे आवश्यक आहे. या प्रकरणात …
Read More »जलदगतीने खटला चालवणे हा आरोपीचा अधिकार असल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळण्याचे प्रकरण : खटला संथगतीने सुरू असल्याच्या कारणांती आरोपीला जामीन
खटला जलदगतीने चालवणे हा आरोपीचा अधिकार आहे. याप्रकरणी खटला जलदगतीने चालवण्याचे विविध न्यायालयांकडून आदेश देऊनही खटल्याच्या सुनावणीत फारशी प्रगती झाली नसल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आणि व्यावसायिक वादातून वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अर्जदाराला न्यायालयाने जामीन मंजूर केला. जलदगतीने खटला चालवला जाणे हा आरोपीचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याविरोधातील खटला जलगतीने …
Read More »प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगणाऱ्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या १९१.५० किलो हेरॉईन बाळगण्याचा आऱोप
अपुरा पुरावा आणि खटल्याच्या प्रगतीविना प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगावा लागल्याचे निरीक्षण नोंदवून क्लियरिंग एजंट व मेसर्स एम. बी. शिपिंग आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेसमध्ये भागीदार असलेल्या कोंडीबा गुंजाळ यांना उच्च न्यायालयाने अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या १९१.५० किलो हेरॉईन जप्तीच्या प्रकरणात जामीन मंजूर केला. गुंजाळ यांचा या अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असलेला …
Read More »अँट्रोसिटी प्रकरणी नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने दिले हे आदेश तपासाचा तपशील, केस डायरी सादर करा, सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात केंद्रीय महसूल अधिकारी (डीजीटीएस) समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच तपासाचा तपशील तपास डायरीसह पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आज तपास अधिकाऱ्याला दिले. नवाब …
Read More »हिंदू जोडीदारासाठी मुस्लिम तरूणाची उच्च न्यायालयात धाव निवारागृहातून जोडीदाराची तत्काळ सुटका करण्याचे आदेश द्या
बेकायदा निवारागृहात ठेवलेल्या आपल्या हिंदू जोडीदाराची तत्काळ सुटका करण्याचे आदेश द्या, अशी मागणी एका मुस्लिम तरूणाने उच्च न्यायालयात याचिकेतून केली आहे. आपल्याला धमक्या येत असून आमच्या दोघाच्या सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस संरक्षण देण्याची मागणीही या तरूणाने याचिकेमार्फत केली आहे. मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपल्या जोडीदाराला चेंबूर येथील शासकीय महिला वसतिगृहात बेकायदेशीररीत्या …
Read More »कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलिस उपनिरिक्षकाची ३१ वर्षानंतर निर्दोष मुक्तता मुंबई फच्च न्यायालयाचा निर्णय
एका चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीची कथित कोठडीतील मृत्यूप्रकरणी ३१ वर्षानंतर या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) सिद्धप्पा सावली यांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले. अर्जदार सावली यांच्याविरोधात करण्यात आलेल्या विभागीय चौकशीत, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारावर त्यांना दोषमुक्त केले होते. त्याचाच आधारावर घेऊन न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने अर्जदार सावली यांची …
Read More »मानवी तस्करीतून सुटका झालेल्या मुलीचा ताबा आई की वडिलांकडे ? निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे बालकल्याण समितीला आदेश
मानवी तस्करीतून सुटका झालेल्या १५ वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे द्यायचा आई की वडीलांकडे?, याबाबतचा निर्णय बालकल्याण समितीनेच घ्यायला हवा, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने प्रकरण निर्णयासाठी मुंबई उपनगराच्या बाल कल्याण समितीकडे वर्ग केले. मुलीचा ताबा मिळावा असा आईचा अर्ज समितीकडे आधीच प्रलंबित असल्यामुळे, मुलीच्या वडिलांनी देखील तिचा ताबा मिळण्यासाठी आठवड्याच्या …
Read More »अहमदाबादला गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून जामीन नाहीच व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन नाहीच
महाराष्ट्रासह गुजरातमध्ये बंदी असलेल्या गोमांसाची वाहतूक केल्याचा आरोप असलेल्या मुंबईतील एका ६४ वर्षीय व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. अर्जदाराकडून सुमारे १,०६५ किलो गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. खटल्यातील तथ्ये जाणून घेतल्यानंतर अर्जदाराविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत आणि वस्तुस्थितीतील सर्व पैलूंचा विचार करता अतिरित माहिती समोर येण्यासाठी अर्जदाराची कोठडीत चौकशी …
Read More »उच्च न्यायालयाकडून वकीलाच्या विरोधातील गुन्हा केला रद्द नातेसंबंधातील दुराव्यामुळेच वकिलाविरोधात बलात्काराची तक्रार
नातेसंबंधांत निर्माण धालेल्या दुराव्यामुळेच वकिलाविरुद्ध बलात्कार आणि धमकीची तक्रार दाखल केल्याचे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या विरोधातील गुन्हा रद्द केला. तक्रारकर्ती महिला आणि याचिकाकर्ता दोघेही परस्परसंमतीने नातेसंबंधात होते. परंतु, त्यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर आणि नात्यात दुरावा आला आणि त्यानंतर तक्रारदार महिलेने याचिकाकर्त्याविरोधात बलात्कार व धमकीची तक्रार नोंदवली. याचिकाकर्त्यानेही या तक्रारीला प्रत्युत्तर …
Read More »
Marathi e-Batmya