अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथील न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग (एनएटी) सेंटरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. अशा प्रकारची सुविधा असणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी आरोग्य संस्था आहे. याचवेळी गॅमा ब्लड इरॅडिएटर या उपकरणाचेही उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. एम्सच्या रक्त संक्रमण विभागातर्फे या …
Read More »पार्थ पवार यांच्या जमिन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून चौकशी समिती विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडीया कंपनीने कोरेगांव पार्क येथील ४० एकर महार वतनाची जमिन खरेदी केल्यावरून राज्याच्या राजकारणात एकच वादळ निर्माण झाले. यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी समितीची स्थापना करत असल्याचे जाहिर केले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सरकारचा एलोन मस्कच्या स्टारलिंकशी करार स्टारलिंकशी भागीदारी करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य
स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागासमवेत सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. यामुळे राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचविण्याची दिशा वाटचाल होत असल्याचा असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाच्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतले २१ निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक आज झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळात एकूण २१ निर्णय घेण्यात आले. यातील काही निर्णय हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून घेण्यात येत आले आहेत. त्यामुळे आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही निवडणूका …
Read More »सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मंजूरी
सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे उभारण्यात येणाऱ्या ३० हजार घरांच्या प्रकल्पाला राज्य शासनाची दिलासादायक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी अनर्जित, नजराणा रक्कमेसह अकृषिक वापर शुल्कातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण झाले पाहिजे, असे नियोजन करण्यात यावे. विविध विकास प्रकल्प तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार
दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार …
Read More »मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीप्रकरणी दिले चौकशीचे आदेश दहा जणांचा मृत्यू, तर ५ जणांचा जखमी
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा भागातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की हे मंदिर एका व्यक्तीचे आहे आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? राज्यातील गुन्हेगारीला फडणवीसांचे पाठबळ; मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक गंभीर प्रश्न
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात उद्योग विभागाचा आढावा
राज्यात ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना २०२५’ राबविण्यात येत आहे. १५४ सुधारणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत केली जाणार आहे. यात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी ‘चिंतन शिबिर’ आणि विभागीय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. …
Read More »
Marathi e-Batmya