मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची निर्घुण हत्या केली आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या गुंडानी केलेल्या या भ्याड कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करीत असून ही काँग्रेस कार्यकर्त्यांची नाही तर लोकशाहीची हत्या आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस …
Read More »पंतप्रधानांनी दुष्काळमुक्त म्हणून जाहीर केलेल्या २५ हजार गावांची नावे जाहीर करा जलयुक्त शिवार नव्हे भ्रष्टाचाराचा मालयुक्त शिवार असल्याचा सचिन सावंत यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना महाराष्ट्रातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व ९ हजार गावे दुष्काळ मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत असे जाहीर केले. परंतु राज्यात जवळपास २०१ तालुक्यातील किमान २० हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली दुष्काळमुक्त गावांची यादी जाहीर …
Read More »राज्यातील २५२ तालुक्यातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा अहवाल
मुंबईः प्रतिनिधी यंदाच्या वर्षी मराठवाडा, विदर्भात पावसाने म्हणावी अशी हजेरी लावली नाही. मार्च महिना यायला अद्याप चार महिन्याचा कालावधी अद्याप शिल्लक राहीलेला असतानाच या दोन्ही विभागातील विहीरी, नद्या, नाले कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यातच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास …
Read More »देशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिपादन
शिर्डी : प्रतिनिधी देशातील बेघरांना सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घर देण्याचा संकल्प सरकारने केला असून गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरांची मुलभूत सोईसुविधांसह निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप, संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन, राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या …
Read More »राज्यात भाजपला एकहाती विजय मिळणे अवघड रा.स्व.संघाच्या सर्वेक्षणात माहिती पुढे
मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. या निवडणूकीत २०१४ ची पुनरावृत्ती होणार की विरोधी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा सोपान मिळणार याची चाचपणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला लागली आहे. त्यादृष्टीने संघाने सुरु केलेल्या सर्वेक्षणात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला वारू रोखला जाणार असल्याची …
Read More »मराठा आऱक्षणाचा निर्णय भाजपच्या यशापशावर परिणाम करणार न्या.गायकवाड समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार
मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसमोर ठेवून राज्यातील सर्वच पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच निवडणूकीच्या रणधुमाळीला अजून प्रत्यक्ष सुरुवात झालेली नसली तरी मराठा आरक्षण, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हळूहळू ऐरणीवर येत आहे. त्यातच मराठा समाजाला आरक्षणासंदर्भातील अहवाल १५ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्य सरकारला सादर करण्यात येणार असून त्या …
Read More »धारावीचा पुनर्विकास आता खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी गेली अनेक वर्षे रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा देत हा प्रकल्प खाजगी-सार्वजनिक पध्दतीने राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतली. तसेच त्यासाठी विशेष हेतू कंपनी (SPV) मॉडेल राबविण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मॉडेलमध्ये मुख्य भागीदाराच्या ८० टक्के समभागाबरोबरच शासनाचा २० टक्के समभागासह सक्रीय …
Read More »आदिवासींना घरे देण्यावरून राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री संघर्षाच्या पावित्र्यात राज्यमंत्री वायकर ४८० चौ.फुटाचे घर देणार तर मुख्यमंत्री म्हणतात ३०० चौ.फुटाचे घर देवू
मुंबईः प्रतिनिधी आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली. मात्र इतक्या मोठ्या आकाराची घरे आदिवासीना देता येणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींना ३०० चौरस फुटाची …
Read More »दारू नको तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले
मुंबईः प्रतिनिधी घरपोच ऑनलाईन दारू पोहोचविण्याचा प्रकार आक्षेपार्ह व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली. काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला घरपोच दारू पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यावर एकाबाजूला राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत …
Read More »मंत्रालयात सरकारी कर्मचाऱ्याने केला आत्महत्त्येचा प्रयत्न पोलिसांनी संबधित इसमास रूग्णालयात केले दाखल
मुंबईः प्रतिनिधी विविध स्वरूपांच्या आरोपात तथ्य आढळल्याने सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आलेल्या दिलीप सोनवणे नावाच्या सरकारी कर्मचाऱ्याने शुक्रवारी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सोनवणे मंत्रालयात उद्योग, कामगार आणि ऊर्जा विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. स्टेशनरी, पंखे आदी सरकारी साहित्य विकणे, वारंवार गैरहजर राहणे अशा …
Read More »
Marathi e-Batmya