नवी दिल्ली: प्रतिनिधी राज्य शासनाचा पुढाकार व जनतेच्या सक्रीय सहभागामुळे महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीणक्षेत्र पूर्णपणे हागणदारी मुक्त झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली येथे आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत केले. २०१९ अखेर राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येकाला घर व स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे उदिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय …
Read More »झोपडीधारकांना मिळणार आता ३०० चौ.फुटाचे घर राज्य सरकारचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी झोपु योजनेतून झोपडीधारकांना २६९ चौ.फुटाचे घर देण्यात येत होते. या क्षेत्रफळात आता वाढ करण्यात येणार असून २६९ ऐवजी ३०० चौरस फुटाचे घर झोपडीधारकांना देण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »शासकिय कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख मिळणार जि.प., विद्यापीठ, अनुदानीत संस्थामधील कर्मचाऱ्यांनाही लागू होणार सरकारचा शासन निर्णय लागू
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या कायद्यानुसार २००५ सालानंतर शासकिय सेवेत रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन योजनेऐवजी अंशदान पेन्शन योजना लागू होते. त्यामुळे सरकारी नोकरदारांना निवृत्तीवेतन तुटपुंजे मिळते. तसेच त्याचे अकाली निधन झाले तरी त्याच्या कुटुंबियांनाही फारसी सरकारी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शासकिय नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे कामाला लागून १० वर्षाच्या आत …
Read More »दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका मुठा कालवा फुटल्याप्रकरणी अजित पवार यांची मागणी
पुणेः प्रतिनिधी शहरातील दांडेकर पूल परिसरातील मुठा कालव्याचा बांद कोसळून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे कालव्याचं हजारो लीटर पाणी पर्वती भागातील झोपडपट्टीत घुसलं. पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेकांचे संसार वाहून गेले. अकस्मात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोरगरिबांचं आर्थिकदृष्ट्या नुकसान झालंच; परंतु मानसिकरीत्या देखील ते खचले आहेत. यापुढे कसं होणार? असा प्रश्न पडलेल्या पूरग्रस्तांची …
Read More »न्यायालाच्या निकालाने शहरी नक्षलवादावर शिक्कामोर्तब माओवादी नक्षलींना गजाआड जावे लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचन्याप्रकरणी कम्युनिस्ट विचारांच्या चार अभ्यासकांवर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य ठरत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची नजर कैदेतील अटक आणखी चार आठवड्यांनी वाढविल्याने शहरी नक्षलवादावर एकप्रकारे शिक्कामोर्तब होत असून त्यांना गजाआड जावेच लागणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशातील वाढता …
Read More »‘सर्वांसाठी घरे’ योजना कंत्राटी अभियंत्याच्या हातात पंतप्रधान आवास योजनेसाठी १६०० कंत्राटी अंभियंते घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वसामान्य नागरीकांना आणि प्रत्येकाला घर देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे अर्थात पंतप्रधान आवास योजनेची घोषणा केली. मात्र सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याचा आराखडा तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पुरेसे अभियंते नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारकडून १६०० कंत्राटी अभियंते नियुक्त …
Read More »मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बनावे सरकार प्रश्नांपासून पळ काढणारे नसून प्रतिसाद देणारे असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
ठाणे : प्रतिनिधी मराठा, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रामाणिक आणि गांभीर्याने प्रयत्न करीत असून ही स्व. अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, व्यवसाय–रोजगार यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत मराठा तरूणांनी नोकऱ्या …
Read More »बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा एसटीचा प्रवास होणार मोफत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीना एस.टी. प्रवास मोफत देण्याचा निर्णय राज्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच एस.टी. महामंडळाच्या सवलतींची व्याप्ती वाढवण्याच्या निर्णयांर्तंगत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. यापूर्वी दहावी पर्यंतच्या …
Read More »म्हाडा, एसआरए इमारतींच्या पुर्नविकासासाठी आता ५१ टक्क्याची अट मुंबईसाठीच्या सारभूत स्वरुपाच्या फेरबदलांनाही राज्य सरकारची मंजुरी
मुंबई: प्रतिनिधी सुधारित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत 33 (5), 33 (7), 33 (10) या नियमानुसार विकसित करावयाच्या प्रकरणांत 51 टक्के संमतीची अट समाविष्ट केली आहे. जेणेकरुन म्हाडाच्या जुन्या इमारती, उपकर प्राप्त इमारती, झोपडपट्ट्या यांचा पुनर्विकास सहजतेने होऊ शकेल. त्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. खाजगी अनआरक्षित जागांवर संक्रमण शिबीर (Transit camp) उभारण्याची तरतूद केली असून …
Read More »अधिवेशनात आश्वासन देवूनही बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळच मिळेना विरोधी पक्षनेते आणि गृहनिर्माण विभागाकडून दोनवेळा स्मरणपत्रे
मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील समता नगर पुर्नविकास प्रकल्पालाच्या मान्यतेवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता हे संशयाच्या भोवऱ्यात आले. याविषयीचा मुद्दा अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित करत राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सदर प्रकरणी बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या आश्वासनास सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी वेळच मिळत …
Read More »
Marathi e-Batmya