Tag Archives: congress

निवडणूक निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले… ‘तो महाराष्ट्र भी तैयार है’ पंजाबमधील बदल भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे - शरद पवार

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या उत्तर प्रदेशातील योगींचे सरकार जाणार असल्याचे भाकित करत पंजाब बद्दल सांगणे कठीण असल्याचे वक्तव्य केले. मात्र आज या पाचही राज्यांचे निकाल जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, …

Read More »

न्यायालयाच्या निर्देशानुसार फक्त “या” पाच महापालिकांच्या निवडणूका आयोग घेणार नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकांचा समावेश

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे गेलेले आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारने कायदेशीर लढण्याच्या अनुषंगाने तयारी केलेली असतानाच तो पर्यंत या निवडणूका होवू नये यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि मुंबई महापालिका अधिनियम १९६५ या कायद्यात सुधारणा करत निवडणूकीचे सर्वाधिकार राज्य सरकारने स्वतःकेड घेतले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मुदत संपून …

Read More »

युध्द परिस्थितीत काँग्रेसनेही नागरीकांना आणले, पण भाजपाच्या प्रवृत्तीची किळस येते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

जवळपास ११ दिवसांपासून युक्रेनविरुद्ध रशियाने सुरु ठेवलेल्या लष्करी कारवाईमुळे जवळपास १० हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अजूनही अडकलेले आहेत. पण या विद्यार्थ्यांना  मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकांची भाषणे व उद्घटाने करत फिरत असल्याची बाब गंभीर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा …

Read More »

फोन टॅपिंगचे आदेश देणारे रश्मी शुक्लांचे ‘बिग बॉस’ कोण? बेकायदेशीर फोन टॅप करणाऱ्या रश्मी शुक्ला यांच्यावर तातडीने कारवाई करा

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर अशाच पद्धतीच्या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. महाविकास आघाडी सरकारने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी करत रश्मी …

Read More »

मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्यानंतर राज्य सरकारने घेतला “हा” मोठा निर्णय ओबीसी आरक्षणप्रश्नी राष्ट्रपतीना पत्र

ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळविण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करत आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. परंतु तो अहवालही आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसींना राजकिय आरक्षण मिळणे आता पुन्हा दुरापास्त बनले. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहीण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …

Read More »

राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे हा महाराष्ट्राचा अपमान राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार करु !: नाना पटोले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही, या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल अशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू, असा …

Read More »

अजित पवार म्हणाले, नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर सरकार ठाम, मात्र… अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य

सध्या ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपाकडून आंदोलन इशारा आणि सभागृहाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम आहे. मात्र सध्या उच्च न्यायालयात सुणावनी सुरु …

Read More »

नाना पटोलेंच्या विरोधात प्रक्षोभक भाषेप्रकरणी माजी मंत्री बोंडेंच्या चौकशीचे आदेश माझगांव दंडाधिकाऱ्यांचे पोलिसांना आदेश चौकशी अहवाल सादर करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल भाजपा नेते माजी कृषी मंत्री आमदार अनिल बोंडे, नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे, भाजपा युवा मोर्चा जालनाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची दखल माझगाव महानगर दंडाधिकारी यांनी घेतली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक …

Read More »

के. चंद्रशेखर राव यांच्या गाठीभेटींचे काँग्रेसने केले स्वागत काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी पूर्ण आणि यशस्वी होऊ शकत नाही

मराठी ई-बातम्या टीम तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपाचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून भाजपाच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातील आघाडी पूर्ण …

Read More »

नाना पटोले म्हणाले, “मोदीजी, शिवजयंतीदिनी क्षमा मागा आणि प्रायश्चित करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना काँग्रेस हजारो पत्र पाठवणार

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राने कोरोना पसरवला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत करुन महाराष्ट्राची बदनामी केली. हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे, या अपमानाबद्दल पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस आपल्या आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू करणार आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून शिवजयंतीदिनी मोदींना महाराष्ट्राची माफी मागायला सांगून आपल्या …

Read More »