पुणे: प्रतिनिधी पुणे, पिंपरी चिंचवड असो वा दिल्ली भारतीय जनता पक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भाजपाने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून आरोप मात्र ते दुसऱ्यांवर करत आहेत. त्यांच्याच आशिर्वादाने स्वीस बँकेतील भारतीयांचा काळा पैसाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टचारी वृत्तीमुळेच देश रसातळाला गेला असून भाजपा हा …
Read More »ज्या स्व. बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्याच चिंरजीवांनी सत्तेसाठी गुडघे टेकले भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या भाजपा विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून आपण सत्तेसाठी किती अगतिक आहोत हेच दाखवून दिले असून काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्या शिवसेनेने राज्याच्या विकासाला वेठीस धरू नये, अशी टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी …
Read More »आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »न्यायपालिकेची स्वतंत्रता धोक्यात घालण्याचे काम कोणाच्या इशाऱ्यावर ? लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी न्यायपालिकेचे पावित्र्य व स्वतंत्रता जपणे गरजेचे-नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी लोकशाही व्यवस्थेत न्यायपालिकेला अत्यंत महत्वाचे व स्वतंत्र स्थान आहे. देशातील जनतेचा आजही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु न्यायपालिकेच्या कारभारातील वाढता हस्तक्षेप चिंतेचा असून त्यांची स्वतंत्रता धोक्यात घालण्याचे काम होत आहे. लोकशाहीसाठी हे अत्यंत गंभीर असून असे प्रकार कोणाच्या इशाऱ्यावर केले जात आहेत? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …
Read More »खुषखबर : वैद्यकीय शिक्षण विभागातील भरतीची जाहिरात लवकरच प्रसिध्द प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग ३ पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर वर्ग ४ ची पदभरती अधिष्ठाता स्तरावरुन करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण …
Read More »धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा देशाचे संविधान व एकात्मता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसचा लढा !: नाना पटोले
मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाने देशाच्या ज़डणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने नियोजनपूर्वक आखणी करुन विकासकामे राबवली, त्यातूनच पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, शिक्षण, रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभी राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि काँग्रेस विचाराने देशातील एकात्मता कायम ठेवली …
Read More »अजितदादांच्या उपस्थित शरद रणपिसे, राज्यपालांचा अल्पसेंकदाचा संवाद पण महत्वाचा १२ आमदारांच्या नियुक्तीवरून झाला संवाद
पुणे : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिना निमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज येथील विधान भवनात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा निरोप घेताना पुण्याचे खासदार गिरीष बापट, काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शरद रणपिसे यांच्यासह अनेक जण उभे होते. त्यावेळी राज्यपाल समोर येताच रणपिसे यांनी राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित …
Read More »दालमियांच्या लाल किल्ल्यावरुन मोदींची पुन्हा फेकाफेकी अमृतकालाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींच्या राज्यातील विषकालाचे काय ? सचिन सावंत
मुंबई : प्रतिनिधी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दालमियांना आंदण दिलेल्या कंटेनधारी लाल किल्ल्यावरून गेल्या ७ वर्षांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याहीवर्षी फेकाफेकी सुरु होती. स्वतःच उद्ध्वस्त केलेल्या वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवणारे मोदी येत्या २५ वर्षात भारतात अमृत काल येईल असे आश्वासन देत आहेत. परंतु गेल्या ७ वर्षातील मोदी सरकारच्याच …
Read More »१४ ऑगस्टचा स्मृतीदिन मोदींना रक्तपाताच्या आठवणीसाठी हवा आहे का ? स्वातंत्र्य व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई- नाना पटोले
नागपूर: प्रतिनिधी १४ ऑगस्ट हा फाळणी भीषण स्मृतीदिन म्हणून पाळण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय हा भविष्यातील धोक्याची घंटा आहे. १४ ऑगस्ट १९४६ रोजी देशात दोन समुदायामध्ये मोठा रक्तपात झाला होता. नरेंद्र मोदींना आता पुन्हा त्या रक्तपाताची आठवण करुन द्यायची आहे का? देशात पुन्हा रक्तपात करावयाचा आहे का? असा सवाल काँग्रेस …
Read More »आत्ताच्या सत्ताधिकाऱ्यांनी देश विकायला काढला मविआ सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटीबद्ध : नाना पटोले
साकोली: प्रतिनिधी देशात काँग्रेसने प्रदीर्घकाळ लोकशाही टिकवून ठेवली आहे परंतु २०१४ पासून केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला संपविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. संविधानाच्या आधारावर काँग्रेसने सत्तेचा उपयोग देशातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता केला. मात्र आत्ताच्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देश विकायला काढला आहे. देशातील सध्याची परिस्थिती …
Read More »
Marathi e-Batmya