भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवाल करून माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. आम्ही जे काही करतो …
Read More »कार्यक्रमात फ्लॉवर पॉट असतो अन् त्याच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीची दुकानदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा शेवटपर्यंत सुरु ठेवणार आहोत. कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भाजपा ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील. तो पर्यंत २७ टक्के तिकिटे आम्ही ओबीसींना देणार हा भाजपाचा निर्धार आहे. भाजपा हा पक्ष ओबीसींच्या विश्वासावर मोठा झाला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगत आम्ही केवळ अलंकारिक पद्धतीने ओबीसींना …
Read More »शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार समग्र शिक्षा अभियानातंर्गत वितरणास प्रारंभ
शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहचवण्याचे नियोजन केले असून यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागातील संचालक कैलास पगारे, …
Read More »कायदा तोडणारा कोणीही असो राज्य सरकार कारवाई करेल राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी: नाना पटोले
महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करेल, असे काँग्रेस …
Read More »मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाची ‘बुस्टर सभा’ पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज …
Read More »शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो अडचणी आहेत का? मग ही बातमी वाचाच अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर संवाद दिनाचे आयोजन
मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांच्या अडचणी स्थानिक पातळीवर आणि तातडीने सोडविणे शक्य होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी अनुदानित/ विनाअनुदानित/ अंशत: अनुदानित शाळेतील …
Read More »भाजपाची ‘बी’ टीम असलेल्या एमआयएमने काँग्रेसबद्दल बोलू नये खा. इम्तियाज जलील स्वल्पविरामाएवढ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष-अतुल लोंढे
काँग्रेस संपलेला पक्ष आहे अशा वल्गना करणारे नेते व पक्ष यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसला संपवणारे संपले, पण काँग्रेस संपलेली नाही आणि संपणारही नाही. एमआयएम ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यामुळे एमआयएमने काँग्रेसची चिंता करू नये स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, असा टोला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व …
Read More »अखेर प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला नकारच, ट्विट करत दिले “हे” कारण काँग्रेसकडून ट्विट करत दिली माहिती
मागील काही दिवसांपासून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेतली. मात्र आज अखेर प्रशांत किशोर यांनी आपण काँग्रेससोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर प्रशांत किशोर यांनी प्रदीर्घ …
Read More »किरीट सोमय्यांच्या दंडेलशाहीला राज्य सरकारने चाप लावावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी
भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बुनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत अरेरावीही करत आहेत. सोमय्यांची ही …
Read More »शरद पवार म्हणाले, येणार म्हणून घोषणा केली पण आले नाहीत म्हणून अस्वस्थ माझेही सरकार बरखास्त केले होते पण मी किक्रेट सामन्याचा आनंद लुटला
राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन राजकारण चांगलेच तापलेले असताना राणा दांम्पत्यांनी केलेल्या राजकिय नाट्यानंतर भाजपाच्या नेत्याकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपासह, राणा दांम्पत्यांवर चांगलाच निशाणा साधला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय …
Read More »
Marathi e-Batmya