Tag Archives: congress

वर्षा गायकवाड यांचा सवाल, आरोग्य विभागाचा ७ हजार कोटींचा निधी जातो कुठे ? नालेसफाईत हातसफाई, मिठी नदीत अजून गाळ तसाच, मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचे ११ व्यांदा शस्त्रसंधीबाबत वक्तव्य, जयराम रमेश यांचा सवाल डोनाल्ड भाई यांच्या वक्तव्यप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे

भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार तोडण्याच्या त्यांच्या धमकीमुळे युद्धबंदी झाली, या त्यांच्या “मित्र डोनाल्डभाई” (अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प) यांच्या वारंवारच्या दाव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे अशी मागणी काँग्रेसने तीव्र केली. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीत मध्यस्थी करून संभाव्य अणु आपत्ती टाळल्याचा ट्रम्प यांनी केलेला दावा पुन्हा एकदा पुन्हा सांगितल्यानंतर काँग्रेसचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, घोडबंदर-भाईंदर बोगदा प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट, तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा

नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, या प्रकल्पातून दुसऱ्या निविदाधारकाचे टेंडर तांत्रिक बाबीचे कारण देत रद्द केले, या कामाचे टेंडर ज्या कंपनीला दिले ती मेघा इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? यामागे काय गौडबंगाल होते? हे आता सर्वांसमोर आले आहे. एमएमआरडीएने आता टेंडर रद्द केल्याने हा …

Read More »

विश्वास उटगी यांची मागणी, येस बँक जपानी सुमितोमो बँकेला विकण्याच्या व्यवहाराची चौकशी करा कोणाच्या हितासाठी येस बँक विक्रीचा घाट घातला जात आहे

जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने (SMBC) अलीकडेच भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या YES बँकेत सुमारे ₹१३,००० कोटींची गुंतवणूक करून २०% हिस्सा विकत घेतला आहे. पुढील टप्प्यात ₹३०,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून ५१% हिस्सेदारीसह YES बँकेवर संपूर्ण ताबा मिळवण्याची त्यांची योजना आहे. हा व्यवहार भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा असून या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी तसेच ही …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, दीडपट हमीभाव देणे दूरच GST च्या माध्यमातून शेतक-यांची लूट कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना समज द्यावी

केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने …

Read More »

पंतप्रधान मोदी पुन्हा बिहार दौऱ्यात म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करून आलो बिहार मधील रोहतास येथील प्रचार सभेत बोलताना केले वक्तव्य

बिहारमधील विधानसभा निवडणूकीसाठी आणखी अवधी असताना सध्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून बिहारचे दौरे आणि जाहिर सभा मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काल रोड शो केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथी प्रचार सभेत बोलताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेला ” शब्द …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? नगरविकास मंत्री शिंदे एकनाथ यांनीच मुंबई केली अनाथ, आपत्ती व्यवस्थापन विभाग, बीएमसी झोपले होते का ?

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाही आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा बीएमसीने कोणतीच पूर्व तयारी का केली नाही. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार …

Read More »

राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू, शिवसेना उबाठाला काँग्रेसचे चोख प्रत्युत्तर सोम्या गोम्याच्या धमक्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष भीक घालत नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळ फासू, त्यांच्या ताफ्यवर दगडफेक करू अशी धमकी शिवसेना उबाठाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी इशारा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही. मविआ गेली खड्ड्यात, आमच्यासाठी आधी सावरकर आणि हिंदुत्व असे वादग्रस्त वक्तव्य करत राहुल गांधी यांना बाळा दराडे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, मोहम्मद अली जिन्नांचा पक्ष व जनसंघाचे बंगालमध्ये युतीचे सरकार

पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले नाहीत हे सरकारचे अपयश आहे. हे दहशतवादी तीनशे किलोमीटर आत आले कसे व परत गेले कसे? याचे उत्तर अमित शाह यांनी दिले नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही ती सोडली व …

Read More »

विनायक सावरकर यांचे नाव संरक्षित कराः सर्वोच्च न्यायालयाने याचिकाच फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांचा निर्णय

मंगळवार (२७ मे २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्ववादी विचारवंत व्ही.डी. अर्थात विनायक दामोदर सावरकर यांचे नाव प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायदा, १९५० अंतर्गत संरक्षित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हजर राहून याचिकाकर्त्याने वैयक्तिकरित्या पंकज फडणवीस यांनी सांगितले …

Read More »