लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्यात रोल बदलले असले तरी… आता महाराष्ट्र थांबणार नाही-पत्रकार संघातील वार्तालापावेळी देवेंद्र फडणवीस यांची माहिती
राज्याच्या मुख्यमंत्री पदी जरी यावेळी मी आलो असलो तरी यापूर्वी मी आणि अजित पवार हे दोघे म्हणून औटघटकेचे सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी उपमुख्यमंत्री तर अजित पवार नंतर आमच्यासोबत आले तेही उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आज मी मुख्यमंत्री झालो, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आमच्यासोबत …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, गुजरातधार्जिण्या सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये काँग्रेसची विधानसभेतील संख्या कमी झाली असली तरी हिम्मत व ताकद कायम
निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, …
Read More »शशी थरूर यांची मागणी, कामगारांच्या कामाचे तास निश्चित करा कर्मचाऱ्यांना वाढत्या विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला
तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार, शशी थरूर यांनी कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांवर मर्यादा घालण्याची आणि त्यांची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची मागणी करत पुढे म्हणाले की, देशातील दीर्घ कामाच्या तासांमुळे कर्मचाऱ्यांना नैराश्य, चिंता, इतर मानसिक आरोग्य समस्या तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांमध्ये ढकलले जाते. शशी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची प्रशासनास इतकी घाई का? दाव्या आधीच निमंत्रण राजभवन आणि राज्यपाल फक्त नावालाच का
संशयातीत बहुमत मिळवून १० दिवस उलटून गेल्यानंतर अखेर विधिमंडळात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाकडून विधिमंडळ पक्षाच्या नेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड आज करण्यात आली. तसेच सत्ता स्थापनेसाठी दुपारी ३ वाजता तिन्ही पक्षाचे नेते राजभवनावर जाणार असल्याची घोषणा भाजपाचे केंद्रीय निरिक्षक विजय रूपानी यांनी जाहिर केले. त्यानुसार अद्याप राजभवनावर तिन्ही …
Read More »नाना पटोले यांचा सवाल,.. मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव का केला ? पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच
विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर …
Read More »नाना पटोले यांची टीका, …भाजपा युती कडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध, कंत्राटी भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू
राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित …
Read More »जयराम रमेश यांची जीडीपी घसरल्यावरून म्हणाले, तथाकथित न्यु इंडियाचे हेच वास्तव भाषणबाजी आणि वास्तविकता यांच्यातील दरी वाढविणारी
जुलै-सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर ५.४% पर्यंत घसरल्यानंतर शुक्रवारी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, जे Q3FY२३ नंतरचे सर्वात कमी आहे. रमेश यांनी सरकारवर आर्थिक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाषणबाजी आणि वास्तविकता यांच्यातील वाढणारी दरी ही आकडेवारी असल्याचा आरोप केला. …
Read More »काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्षांची बदनामी करणाऱ्या नागपूरच्या बंटी शेळकेंना नोटीस बेशिस्त वर्तन करून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर काँग्रेस कारवाई करणार.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर प्रदेश काँग्रेसकडून कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष …
Read More »नाना पटोले यांची मागणी, वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली?
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या …
Read More »
Marathi e-Batmya