Tag Archives: devendra fadnavis

विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे यांचे वारकरी दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान वारकऱ्यांच्या मागणीनुसार दौंडचा प्रस्तावित कत्तलखाना रद्द, वारकऱ्यांना अपघात गटविमा, वाहनांना टोल माफी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीतील भाजपा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक ते दिड टक्का मतदान कमी झाल्याची माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूकीला अद्याप तीन ते चार महिन्यांचा अवकाश असला तरी कमी झालेल्या मतांची टक्केवारी …

Read More »

महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्प सादर होणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

देशातील लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्याचा निकालही जाहिर झाला. मात्र ऐन मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने त्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करता आला नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती यापूर्वीच अजित पवार यांनी दिली होती. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, औद्योगिक सुरक्षेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कुठे ? डोंबिवलीनंतर नागरपूरातील कंपनीतही स्फोट

गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येत आहे. या घटना सतत घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पुढे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,… टँकर भरण्यासाठी सोलर पंप वापरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून पर्यंत संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही, देवेंद्र फडणवीस यांची मात्र सारवासारव लोकसभा निवडणूकीत फक्त अजित पवार गटाला एक जागा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाला बारामतीतील घरची जागा राखता आली नाही. यापार्श्वभूमीवर फक्त रायगडमधील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे याचा विजय झाला. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होत शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे गटाने चक्क ७ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, मी पळणार नाही तर लढणारा विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, आणि तुम्हीही थांबू नका असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत हा देवेंद्र फडणवीस पळणारा नाहीतर लढणारा असल्याची स्पष्टोक्ती भाजपा आमदारांच्या बैठकीत बोलताना दिली. भाजपा आमदारांच्या …

Read More »

मनसेने पुन्हा घेतली निवडणूकीच्या रिंगणातून माघार अभिजित पानसे पुन्हा अर्ज काढून घेणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला पाठिंबा जाहिर करत पक्षाच्यावतीने उमेदवारही उभे केले नाहीत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीतही राज ठाकरे यांनी उमेदवार न देता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, … देवेंद्र फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक भाजपाने लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली तर मोदींनीच राजीनामा द्यावा

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा देत निवडणुक लढवली तर महाराष्ट्रात ४५ जागा जिंकणार असा भाजपाचा अहंभाव होता परंतु देशातील जनतेप्रमाणे राज्यातील जनतेनेही भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात भाजपाची कामगिरी अत्यंत खराब झालेली आहे याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीव झाली, आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, पुणे अपघात प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न

राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, पुणे नंतर आता नागपूरात ड्रंक अँड ड्राईव्ह, कडक कारवाई करा आरोपीच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ

पुणे येथील कल्याणीनगर येथे दाऊ पिऊन पोर्शे कार सुसाट चालवित दोघांचा निष्पाप बळी घेतल्याचे प्रकरण अद्याप ताजे असताना आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरातच आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील …

Read More »