Tag Archives: devendra fadnavis

अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, …

Read More »

मराठा- कुणबी आरक्षणासाठीचा शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल आज राज्य शासनास सादर करण्यात आला. विधानभवनाच्या मंत्रिमंडळ कक्षात हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार…मोर्चा आम्ही काढला पण सेटलमंट करायला भाजपा कुठे होती सोबत

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा वादग्रस्त उद्योगपती अदानी समुहाला दिली. ही निविदा फक्त अदानीला मिळावी यासाठी राज्य सरकारने काही नव्याने अटी घातल्या. तसेच अदानी समुहाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होण्यासाठीच या अटींचा समावेश करण्यात आल्यावरून आरोप-प्रत्यारोप फेरी झडत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, ….भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद आजही

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ताकारणात अंतिम शब्द टाकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्यातील खेळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीचे उद्घटन करताना शरद पवार यांनी जाहिररित्या इशारा दिला. मात्र तो इशारा नेमका त्यांचे पुतणे अजित पवार यांना की भाजपाच्या नेत्यांना …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, … बड्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्याने दबाव आहे का?

ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली आहे. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम व सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते मग एवढे कार्यक्षम …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार,…त्या निर्णयाचे पाप देवेंद्र फडणवीस यांचेच

२०१८ साली काढलेल्या शासन निर्णयाचे पाप हे देवेंद्र फडणवीसांचेच असून मोतीलाल नगर, आदर्श नगर, रेक्लमेशन अदानीला आणि धारावी करांना इथल्या जागेवरून मिठागरांच्या जमिनीवर नेऊन वसवणार आणि पुन्हा मिठागरांच्या जमिनीचा पुर्नविकास म्हणत त्या जमिनीही पुन्हा अदानीच्या घशात घालणार असा असा आरोप करत मुंबई काय तुमच्या मालकीची आहे का, मुंबई इथल्या माणसांची …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला,… मग तुम्ही कशासाठी अदानीचे बुट चाटतय

मध्यंतरी सरकारची एक योजना सुरु झाली. शासन आपल्या दारी खरं तर हे सरकार अदानीच्या दारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ५० खोके एकदम ही ओके अशी घोषणा तुमची आहे. मी काही दिली नाही. त्या बोक्यांना आता खोके कमी पडले की काय धारावी आणि मुंबई गिळायला बसले अशी खोचक टोला राज्यातील …

Read More »

संदीप क्षिरसागर यांनी सांगितली आपबितीः फडणवीस म्हणाले, दोन दिवसात एसआयटी…

राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणाप्रश्नावरून आक्रमक रूप धारण केल्याने काही दिवसांपूर्वी बीड शहर आणि माजलगांव येथील मोठ्या प्रमाणावर जाळपोळीच्या घटना घडल्या. याच जाळपोळीच्या घटनांमध्ये शरद पवार समर्थक आमदार संदीप क्षिरसागर यांच्या घराला आणि अजित पवार गटाचे समर्थक आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावत त्यांच्या घरासमोरील वाहनांही लक्ष्य करण्यात आली. या सर्व …

Read More »

सुधाकर बडगुजर म्हणाले, व्हिडीओ मॉर्फ.., सुषमा अंधारे यांचा प्रत्यारोप, त्या पार्टीत भाजपा नेतेही…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख सुधाकर बडगुजर आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे फोटोग्राफ सादर करत शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधण्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत त्या …

Read More »

नितेश राणे यांचा आरोप, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी

मागील काही महिन्यांपासून राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात चांगलेच वाक् युध्द रंगलेले आहे. तसेच या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. तसेच विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर …

Read More »