मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे- फडणवीस – पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा ढोल पिटला जात असला तरी हा फक्त आकड्यांचा खेळ आहे, प्रत्यक्षात जनतेच्या हाती जेव्हा काही लागेल तेंव्हाच ते कळेल. मराठवाडा दुष्काळाच्या …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार सुप्रशासन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव
स्वराज्य मॅगझीनच्यावतीने गुड गव्हर्नन्स (सुप्रशासन) आणि महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाँडेचेरीत ‘पाँडी लिट फेस्टिव्हल’मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत हा पुरस्कार स्वराजचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न विश्वनाथन आणि संपादकीय संचालक …
Read More »छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग, धाराशिव जिल्हा नामकरण फलकाचे तिघांकडून उद्धाटन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती …
Read More »अखेर औरंगाबाद, उस्मानाबादच्या तालुका, जिल्हा आणि विभागाचे नामांतर मराठवाड्यातील बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाविकास आघाडीने सरकारला उलथवून टाकत राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्दबादल ठरवित पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र औरंगाबाद नामांतर प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना आणि मराठवाडा …
Read More »अंबादास दानवे यांचा टोला, मागील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणा अजूनही अपूर्णच ४१ हजार कोटींच्या घोषणा अद्यापही अपूर्णच
२०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक झाली होती.या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ४१ हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.परंतु यामध्ये घेण्यात आलेले निर्णय अजूनही अपूर्ण असल्याची माहिती पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली.सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस हे सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास देवेंद्र फडणवीस का गेले नाहीत? एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असाच त्याचा अर्थ होतो पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी यावे महिनाभरात आरक्षण द्या
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून उपोषण आंदोलन करीत आहेत. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. दरम्यान या बैठकीच्या ठराव प्रत आज माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत… भाजपा आणि शिंदे गटावर केली सडकून टीका
शिवसेनेतील फुटीर गटाकडून आणि भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेची काँग्रेस केल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २५ वर्षे ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी आतापर्यंत आमची दोस्तीच पाहिली. मात्र आता आमच्या मशालीची धगही सोसा असा गर्भित इशारा भाजपाला देत २५ …
Read More »महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी मान्य
केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली आहे. महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होऊन शेकडो …
Read More »भाजपा झाली चिंतीत, ४० टक्क्याच्या रिपोर्ट कार्ड वाल्यांना घरचा रस्ता अजित पवार यांच्या येण्याने भाजपाची गोची वाढली, तर एकनाथ शिंदेंना तुमचं तुम्हीच बघा म्हणण्याच्या तयारीत
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे २०२४ च्या निवडणूकीतही आपणच पंतप्रधान पदी परत येणार असल्याची घोषणा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना केली. तसेच लोकसभा निवडणूकीत जागा वाढविण्यासाठी लहान-मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुट पाडण्याचे कामही सुरु करण्यात आले. परंतु आता हेच फुट पाडणे भाजपाच्या …
Read More »
Marathi e-Batmya