Tag Archives: devendra fadnavis

शरद पवार यांची भाजपावर टीका, मी इतकी वर्षे भाजपावाल्यांना बघतोय पण त्यांची विधाने पोरकट एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न...

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांची भेट घेतली. युवा वर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेव्हा पुण्यात भेट दिली, त्याचवेळी मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दोघांशी संवाद साधल्यानंतर …

Read More »

फडणवीसांच्या त्या दाव्यावर शरद पवारांचा खोचक टोला, ते तर मी चेष्टेत बोललो राष्ट्रपती राजवट उठविली गेली नसती तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का

मागील काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव घेत त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच अजित पवारांसोबत शपथ घेतल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, जर त्यावेळी राष्ट्रपती राजवट उठवली गेली नसती तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का ? असे …

Read More »

उपमुख्यमंत्री, मंत्री मुंबईबाहेर मात्र प्रशासनाला अमृतच्या एमडी पदासाठी कोणाचा सतत फोन? अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी विजय जोशी यांची नियुक्ती

एखाद्या महत्वाच्या पदाकरीता विशिष्ट व्यक्तीचीच निवड करावी यासाठी आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून शिफारस पत्र जाणे किंवा त्या कार्यालयातून एखाद्याने फोन करून शिफारस करणे आदी गोष्टी मंत्रालय आणि जिल्हास्तरीय प्रशासनात नव्या नाहीत. मात्र ओबीसी आणि बहुजन समाजाच्या शैक्षणिक कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी विशिष्ट …

Read More »

जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ‘मिशन मोड’ वर राबवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसुली कामकाज जलद व पारदर्शी करण्यात यावे. जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या ‘मिशन मोड’ वर राबवाव्यात. अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल प्रशासनाला दिल्या. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा इशारा, असे अनेक गौप्यस्फोट होत राहतील त्यांच्या अनेक उत्तरातून ही माहिती बाहेर काढणार

गेल्या काही दिवसांपासून साधारणतः अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शपथविधीच्या घटनेवर सातत्याने नव्याने चर्चा होत आहे. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर सुरुवातीला यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »

शरद पवारांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा आव्हान, आता त्यांनीच पुढचे सांगावे ही अपेक्षा राष्ट्रपती राजवट कोणाच्या सांगण्यावरून लागू करण्यात आली-फडणवीस

एकाबाजूला भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्रित येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेत सरकार स्थापन केले. यावरून मागील १५-२० दिवसांपासून ही घटना चांगलीच चर्चेत आली. यापार्श्वभूमीवर आधी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना …

Read More »

शरद पवार यांचे मिश्किल विधान, कोणत्याही घटनेमागे फक्त एकाच व्यक्तीचे नाव पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगले झाले राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली गेली

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अडीच तीन वर्षापूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधी मागे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे विधान केले. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवार यांच्याबरोबर शपथ घेतली होती, …

Read More »

गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रु. आनंदाचा शिधा दिवाळी प्रमाणे या दोन्ही दिवशी शिधा वाटपाचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खा. संजय राऊत प्रकरणी चौकशी करून दोषींना अद्दल घडवा

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असून त्यांचा घातपात करण्याचा डाव समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे समजते. असे प्रकार राज्यात वाढत असून विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला …

Read More »

संजय राऊत यांचा आरोप, खा श्रीकांत शिंदेंनी कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी उपमुख्यमंत्री फडणवीस, अमित शाह यांना पत्र लिहून दिली माहिती

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असल्याची माहिती राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. याबाबत बोलताना …

Read More »