Tag Archives: devendra fadnavis

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार

पोलिसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. ४० वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेन्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलिसांच्या संपूर्ण …

Read More »

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहिर करत त्यांचा उमेदवारी अर्जही भरला. त्यापाठोपाठ शिंदे गट-भाजपाच्यावतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर या दोघांकडूनही प्रचाराचे रणशिंग फुंकत प्रचाराला सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहिर …

Read More »

नागपूरकरांनी भाजपा आणि फडणवीसांच्या धोरणांना नाकारले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची टीका

भाजपाच्या चुकीच्या धोरणांना व दडपशाहीला देशातील जनता कंटाळली असून आता हळूहळू ग्रामीण भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये नागपूरकरांनी भाजपला सपशेल नाकारले आहे असा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या नागपूर येथील पराभवावर जोरदार टीका …

Read More »

अंधेरी पोटनिवडणूक: ठाकरे गटाला राज ठाकरे यांचा पाठिंबा, केले भाजपाला आवाहन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवार मागे घ्या

अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली. त्यानंतर काल शनिवारी दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन भेटीमुळे राज्याच्या राजकारणात या भेटी कशासाठी आणि का? अशी चर्चा सुरु झाली. त्यातच आज रविवारी सकाळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या …

Read More »

नाना पटोलेंचा इशारा, .. अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही राज्यातील दळभद्री सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा छदामही अजून मिळालेला नाही, पंचनामे करण्यातही प्रशासन ढिम्म असून आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तात्काळ ओला …

Read More »

अजित पवार म्हणाले, …महाराष्ट्राची ही संस्कृती नाही

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यापासून अनेक जिल्हा आणि विभागांना देण्यात आलेला निधी रद्द करण्याचे काम सुरु झालेले आहे. त्याचबरोबर आघाडीच्या विविध मंत्र्यानी घेतलेल्या विकास कामांनाही स्थगिती देण्यात येत असल्याचे उघडकीस येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले असून महाराष्ट्राची ही संस्कृती …

Read More »

शिंदे गटाच्या आमदारांची मंजूर कामे भाजपाच्या मंत्र्याने रद्द केल्याने धुसफुस शिंदे फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत धुसफुस वाढली

राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गट आणि भाजपाचे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. मंत्रिमंडळाचा विस्तार होताच शिंदे गटाच्या अनेक आमदारांमध्ये मंत्री पदावरून तर पालकमंत्री पदावरून तर आपला मूळ मतदार संघ बदल्यावरून नाराजी नाट्य रंगू लागले असताना आता या सरकारमध्ये विकास कामं रद्द करण्यावरून पुन्हा एकदा अंतर्गत …

Read More »

शिंदे सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खुषखबर, दिवाळी अग्रिम मिळणार

दिवाळीला आता काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घालण्याच्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीनिमित्त अग्रिम देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण उत्साहात साजरा होणार आहे. राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती

विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थगिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागच्या वर्ष – दीड वर्षात जे निर्णय वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी किंवा महाराष्ट्रातील …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा

राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे समजते. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरिब व सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील …

Read More »