शिवसेनेत बंडखोरी करून वेगळी चूल मांडणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर अनेक माजी नगरसेवकांसह शिवसैनिक त्यांच्या गटात सहभागी होत आहेत. तर काहीजण उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत राहणार असल्याचे जाहिरपण सांगत आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे …
Read More »बंडखोरी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेबाबतचा फैसला “या” तारखेला शिवसेनेच्या १६ आमदारांबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भवितव्यही ठरणार
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अल्पमतात आणले. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. …
Read More »अजित पवार म्हणाले, नगराध्यक्ष- सरपंचच कशाला मुख्यमंत्री, राष्ट्रपतींची निवडही जनतेतून… बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला खोचक सवाल
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडूण देण्याचा फडणवीस सरकारच्या काळातील निर्णय रद्दबातल ठरविला होता. मात्र राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाविकास आघाडीने रद्दबातल केलेला निर्णय पुन्हा लागू केला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलाच …
Read More »संजय राऊत म्हणाले, दोघाचंच मंत्रिमंडळ पाह्यला का? बेकायदेशीर आहे माझी टीका झोंबते ना पण मी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्यावतीने बोलतोय
राज्यातील महाविकास आघाडीला घालवून शिंदे-फडणवीस यांचे सरकार नव्याने स्थानापन्न झाले. या नव्या सरकारला राज्यात येवून १५ दिवस होवून गेले. तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच मंत्रिमंडळाने आतापर्यत दोनवेळा मंत्रिमंडळ बैठक घेत निर्णय घेतले. यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी …
Read More »एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज, राज्य सरकारने दिली हमी ठाणे कोस्टल रोड, भुयारी मार्ग, शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी कर्ज
एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्कामोर्तब औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर
अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र या स्थगितीवरून सर्वचस्थरातून टीका व्हायला लागल्यानंतर …
Read More »नव्या सत्ताधाऱ्यांचे नऊ दिवस संपेना, आधी माईक, नंतर चिठ्ठी आणि आता कानात कुसफुस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेच्या कानात बोलत करून दिली आठवण एमएमआरडीएची
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवून देत नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी झाला. मात्र या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्य मंत्रिमंडळाचा कारभार हाकत आहेत. मात्र या सरकारच्या नव्याचे नऊ दिवस काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »अखेर “या” कारणामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले… राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसल्याने विधिमंडळाचा निर्णय
राज्यात सत्तांतर होत बंडखोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. मात्र शिंदे-फडणवीसांचा शपथविधी होवून १५ दिवस उलटले तरी या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे उद्या जावून विधिमंडळ अधिवेशन बोलावले तर विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे कोण जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे …
Read More »सुप्रिया सुळे यांचा बंडखोर आमदारांना सवाल, आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? एक आमदार असणाऱ्याकडे १०५ आमदार असलेला नेता गेला
काल शिंदे-फडणवीस सरकारची पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक चिठ्ठी लिहून मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दात टीका करत बंडखोर आमदारांना …
Read More »जयंत पाटील म्हणाले; कुणाला किती खाती, कुणाचे किती मंत्री यातच सरकारचा वेळ संकटात सापडलेल्या जनतेसाठी तात्काळ मदतकार्य सुरू करा
महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत मात्र अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नांदेड दौऱ्यावर …
Read More »
Marathi e-Batmya