महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर २०२२ पासून यांची सुरुवात होणार आहे. विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »अजित पवार म्हणाले, आता पार दुष्काळाचं वाटोळं झालं
परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यातच खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकंही हातची गेली असल्याने काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांनासमोर निर्माण झाला आहे. मात्र परतीच्या पावसांने उघडीप देऊन तीन-चार दिवस झाले तरी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही की, पंचनामे झालेले नाहीत. या सगळ्या गोष्टीनंतर …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थीना मानधन केव्हा?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थीना दरमहा मानधन मिळण्याबाबतचा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून वित्त विभाग, आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून वित्त विभागाकडे सादर करावा. असे निर्देश तत्कालीन ठाकरे मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले होते, आज वर्षे होऊन गेले. तरी हा प्रस्ताव …
Read More »देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, उध्दव ठाकरेंना दिवाळी शुभेच्छा दिल्या नाहीत पण जरूर देऊ उध्दव ठाकरे यांच्याबरोबर युती करणार का? राजकारणात काहीही अशक्य नाही
अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटूता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र राजकारणात कटूता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील करेन. पण एक चांगले आहे की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणूका कधी होणार हे ईश्वर आणि न्यायालयाला ठाऊक महापलिका निवडणुकीबाबत संभ्रम कायम
मागील अडीच वर्षात राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपलेली आहे. तसेच या महापालिकांवर सध्या प्रशासकांची नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गेलेले ओबीसींचे आरक्षण परत मिळाल्याशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले …
Read More »तीन महिन्यात महाविकास आघाडीचे ‘हे’ निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलले
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सीबीआयला राज्यातील घडामोडींचा तपास आणि एफआयआर नोंदवण्यास महाविकास आघाडी सरकारने नाकारलेली परवानगी पुन्हा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारने मागील महाविकास आघाडी सरकारच्या किमान अर्धा डझन निर्णयांना स्थगिती दिली आहे किंवा ते रद्द केले आहेत. नवीन सरकार सत्तेवर येताच आधीच्या सरकारचे निर्णय …
Read More »शरद पवारांनी केली पोलखोल, वसूलीला कोणी जात नसल्याने ती कर्जमाफी पुरंदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा
मागील आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भू-विकास बँकेच्या कर्जदारांचे ९६४ कोटी रूपयांचे कर्ज माफ करत असल्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांनाही होणार असल्याचे जाहिर केले. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाची पोलखोल करत …
Read More »एकनाथ खडसे म्हणाले, राजकियदृष्ट्या संपविण्यासाठीच भूखंड प्रकरण
भोसरी भूखंड प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत पुणे न्यायालयाने संशय व्यक्त करत एकनाथ खडसे यांना अटक करण्यापासून मज्जाव केला. तसेच नव्याने फेर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताई नगर येथे पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांचे नाव न …
Read More »उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा, शिवसेनेशी गद्दारी केलात शेतकऱ्यांशी नको औरंगाबादेतील दौऱ्यात उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र
राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला हातचा घास गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज रविवारी औरंगाबादेतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, पण त्याचं अजून मंडळांना परवानग्या देणंच सुरूय शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं कोणीही बोलत नाही
मान्सूनचा कालावधी संपलेला असला तरी राज्यातून मान्सून पूर्णत: गेलेला नाही. त्यातच परतीचा पाऊसही राज्यातील अनेक भागात अद्यापही थैमान घालत आहे. त्यातच दोन वर्षानंतर पहिल्यांदाच दिवाळी सण निर्बंधमुक्त पध्दतीने साजरी होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्यातील जनतेला १०० रूपयात शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा शिधा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत …
Read More »
Marathi e-Batmya