मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते …
Read More »मुख्य सचिवांच्या अहवालात फडणवीस, रश्मी शुक्लांचे पितळ उघडे: वाचा अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अहवाल सादर
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाच्या आधारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. तसेच या भ्रष्टाचारात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर संशयाची सुई फिरविण्यात आली. मात्र याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांनी तपासणी केला असता …
Read More »देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा ! युपीएच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करण्याचा संजय राऊतांना अधिकार नाही-नाना पटोले
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत. सीडीआरबद्दलही ते विधानसभेत खोटे बोलले असून ते …
Read More »फडणवीसांनाच हप्ताखोरीचा अनुभव पाच वर्षात आरएसएसला किती वाटा दिला?- नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व …
Read More »राज्य सरकारने मंजूरी देवूनही प्रधान सचिवांचा मात्र विरोध पुणे विद्यापीठास पाली भवन उभारण्यासाठी निधी देण्यास नकार
मुंबई: प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्य शासनाने विविध उपक्रम राबविले होते.त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाली भवन उभारण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतला होता. त्यानुसार सर्व कायदेशीर बाबी पुर्ण झाल्या असतानाही …
Read More »राजकियदृष्ट्या काही करता येईना म्हणून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरले परमवीरसिंग यांचे आरोप स्वतःला वाचवण्यासाठी आणि सरकारची बदनामी करण्यासाठी-नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकार्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत असा आरोप करतानाच फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चूकीच्या पध्दतीने ठेवत महाराष्ट्राची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री …
Read More »पोलिसांतील बदल्या, पदोन्नतीबाबत फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट दूरध्वनी संवादासह सर्व कागदपत्रे केंद्रीय गृहसचिवांना देणार
मुंबईः प्रतिनिधी पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा २५ ऑगस्ट २०२० रोजीच पर्दाफाश झालेला असतानाही दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणार्या अधिकार्यांनाच बाजुला करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत यासंबंधीचा तत्कालिन गुप्तवार्ता प्रमुख, पोलिस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील पत्रव्यवहारच आज उघड करीत महाविकास …
Read More »“मग हे देशमुख कोण?” फडणवीसांचा पवारांना सवाल फडणवीसांच्या प्रश्नावर देशमुखांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी परमबीर सिंग यांच्या आरोपातील तथ्य खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देशमुखांची बाजू मांडत असतानाच मुंबईतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांनीच १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्रकार परिषदेचे केलेले ट्विट रिट्विट करत थेट मग हे कोण असा सवाल पवारांना …
Read More »पवारांची गृहमंत्री देशमुखांना क्लीनचीट पण फडणवीसांच्या ट्विटमुळे अडचण राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून उडालेला राजकिय धुराळा खाली बसविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत अनिल देशमुख हे ३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत कोविड-१९ या विषाणूमुळे रूग्णालयात दाखल होते आणि त्यानंतर ते गृह विलगीकरणात असल्याचे सांगत क्लीनचीट दिली. मात्र विरोधी पक्षनेते …
Read More »फडणवीस म्हणाले, फक्त परमबीर सिंग यांची चौकशी करणार कि गृहमंत्र्याचीही? पवारांना दोष देणार नाही ते निर्माते असल्याने त्यांना सरकारचा बचाव करावा लागणार
नागपूर: प्रतिनिधी ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची केवळ ते चौकशी करणार का? कि गृहमंत्र्यांचीही चौकशी करणार असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना करत १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का? असा उपरोधिक …
Read More »
Marathi e-Batmya