बिहार-मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कार्टून व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी नौदलातील निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या कथित मारहाणप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून राज्यपुरस्कृत दहशवाद थांबविण्याचे आवाहन करत हे निषाधार्ह असल्याची टीका त्यांनी बिहारमध्ये जावून केली. बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची बिहारच्या प्रभारी पदी भाजपाने नियुक्ती केली. त्यामुळे …
Read More »कोरेगांव भीमा चौकशी आयोगाला तीन महिन्याची मुदतवाढ गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई: विशेष प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील कोरेगांव भीमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोरेगांव भीमा चौकशी आयोगाला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आहे. ज्या दिवशी आयोग आपले कामकाज सुरु करेल त्या दिवसापासून पुढे तीन महिने मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मराठी ई-बातम्या.कॉमशी बोलताना दिली. …
Read More »मराठा आरक्षण : न्यायालयाच्या निर्णयावरून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका प्रयत्नांवर पाणी फेरले गेल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील सरकारने केलेल्या सर्व प्रयत्नांवर आजच्या सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरल्या गेले असून विद्यमान सरकारने सर्वांना विश्वासात घेवून कारवाई केली असती तर आरक्षण टिकविता आले असते. पण हे सरकार पहिल्यापासून आरक्षणाबाबत गंभीर नसल्याने ही वेळ आल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी ठाकरे …
Read More »कॅग’च्या अहवालाने जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची फडणवीसांवर टीका
मुंबई : प्रतिनिधी कॅग’च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॅग’च्या अहवालावरून फडणवीसांवर टीका केली. ‘कॅग’चा अहवालही सांगतो की, भाजपच्या सर्व आश्वासनांप्रमाणे जलयुक्त शिवार योजनाही ‘मुंगेरीलाल के हँसीन सपने’सारखीच ठरली आहे. विरोधी पक्षात असताना जलयुक्त शिवार योजना उपयुक्त …
Read More »मुख्यमंत्र्याकडून विरोधी पक्षनेते फडणवीसांना प्रतित्तुर : हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून शेवटचे निवेदन करताना सव्याज परत
मुंबई: प्रतिनिधी विधानसभा कामकाजाच्या समारोपाच्यावेळी राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियांनाची माहिती देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी केलेल्या टीकेचे प्रतित्तुर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देत फडणवीसांच्या टीकेची परतफेड केली. दुपारच्या सत्रात कोरोना आणि मेट्रो कारशेडसह इतर प्रश्नावरील चर्चेच्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून सर्वच प्रश्न प्रतिष्ठेचे …
Read More »मुंबईत कोरोनाचे ७५०० नव्हे तर १५ हजार मृत्यू : कारशेड हलविल्यास आर्थिक फटका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र सरकारचे काम हे फक्त कागदावरच दिसून येत असून प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. राज्य सरकारने आतापर्यत एकट्या मुंबईत ७५०० मृत्यू मुंबईत झाल्याचे सांगितले आहे. परंतु मुंबईत ७५०० नव्हे तर १५ हजार …
Read More »शिवसेनेने अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंग ठराव आणल्याने भाजपा आक्रमक सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब
मुंबई: प्रतिनिधी हिंग्लीश भाषेतील रिपब्लिक वृत्तवाहिनेचे संपादक-अॅकर असलेले अर्णब गोस्वामी हे सातत्याने राज्यातील नेते, मुख्यमंत्री यांच्याबाबत एकेरी शब्दात उल्लेख करत असून चुकीच्या पध्दतीचे वृत नेहमी प्रसारीत करत आहेत. त्यांच्याकडून सुपारी घेतल्यासारखे वृत्तांकन करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी करत गोस्वामी विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव आणण्यात आला. हा ठराव आणताच भाजपाचे …
Read More »या विधेयकावरून फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये झाली खडाजंगी हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवारांच्या उत्तराने झाले नाही समाधान
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासंदर्भातील विधेयक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधासभेत मांडले. मात्र त्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेत सध्या हे याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने त्याबाबतचे विधेयक सभागृहात मांडता येत नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे …
Read More »कोरोनाने घालवली सत्ताधारी आणि विरोधकांची एक संधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या संकेत आणि प्रथा पहिल्यांदाच मोडित
मुंबई: विशेष प्रतिनिधी देशात सांसदीय कार्यप्रणालीनुसार कामकाज चालत असल्याने पावसाळी, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काही गोष्टींचे आयोजन राज्य सरकारकडून करण्यात येते. त्या गोष्टींना हजेरी लावायचे कि नाही याचा निर्णय राजकिय विरोधकांनी घेण्याचे स्वातंत्र्यही आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच कोरोनामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ना कोणती राजकिय गरमागरमी ना कोणत्या प्रथा आणि संकेताचे पालन अशी …
Read More »कंगना टीम म्हणजे कंगना +भाजप आय टी सेल देवेंद्र फडणवीस आणि भाजपने महाराष्ट्राची विनाशर्त माफी मागावी- काँग्रेसची मागणी
मुंबई : प्रतिनिधी कंगना टीम म्हणजे “कंगना + भाजप आय टी सेल” असून कंगनाच्या ट्वीट आणि वक्तव्यांमागे भारतीय जनता पक्ष आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा आणि आमची मुंबईवरती प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे. याबद्दल कंगना रानावतचे …
Read More »
Marathi e-Batmya