Tag Archives: eknath shinde

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवरून अजित पवारांची टीका, पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणूकीत फिराव लागतंय.. कसबा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा रोड शो

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा- शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात ‘रोड शो’ केला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला, तोंड लपवून पळणारा नाही….कृष्णेच्या का काठावर प्रायश्चित… लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता

पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभेत बोलताना विरोधी …

Read More »

शरद पवार यांची भाजपावर टीका, मी इतकी वर्षे भाजपावाल्यांना बघतोय पण त्यांची विधाने पोरकट एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न...

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांची भेट घेतली. युवा वर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेव्हा पुण्यात भेट दिली, त्याचवेळी मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दोघांशी संवाद साधल्यानंतर …

Read More »

MPSC ने अखेर विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे माघार घेत केली मागणी मान्यचे ट्विट सुधारित परीक्षा योजना, अभ्यासक्रम २०२५ पासून

कोरोना काळापासून MPSC कडून जाहिर करण्यात आलेल्या सुधारीत परिक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयाविरोधात सातत्याने विरोध दर्शवित पुण्यात आंदोलन केले. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत MPSC प्रशासनाला विनंती करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार विनंती पत्रही देण्यात आले. तरीही याबाबतचा सुधारीत निर्णय …

Read More »

सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर कपिल सिब्बल म्हणाले, राज्यपालांची भूमिका तशीच… सभागृह नेत्यांने सांगितल्याशिवाय राज्यपालांना भूमिका घेता येत नाही

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थानापन्नतेपर्यंतचा कालावधीत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका नेहमीच संशयातीत राहिली आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तांतर आणि त्यातील राज्यपालांची भूमिका यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील सुनावणीत जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी ठाकरे गटाचे वकील …

Read More »

राहुल नार्वेकर म्हणाले, १० व्या परिशिष्टमध्ये स्पष्ट तरतूद हे संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचे

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ही याचिका दाखल करून घेण्याबाबत दोन दिवस युक्तीवाद ऐकल्यानंतर आज अखेर न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिका दाखल करून घेत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच शिंदे गटाकडून …

Read More »

ठाकरे गटाला दिलासाः शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला न्यायालयाची नोटीस दोन आठवडे व्हिप जारी करत ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई न करण्याची हमी

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. हा निकाल देताना ज्या सादिक अली खटल्याचा संदर्भ देण्यात येत आहे, त्या खटल्यात निवडणूक आलेले लोकप्रतिनिधी आणि मुळ पक्षाच्या सदस्यांच्या संख्येच्या प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेऊन निकाल देण्यात आला होता. मात्र शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या लढाईत …

Read More »

फुटलेल्या आमदारांच्या गटाला प्रतोद बदलण्याचा अधिकार कोणी दिला? कपिल सिबल यांचा सवाल शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केले

शिवसेनेतील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी नियमीतपणे सुनावणी सुरु आहे. आजच्या २२ फेब्रुवारी रोजी सुनावणीत शिवसेनेचे ठाकरे गट वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. पक्ष कोणाचा, व्हीप कोण बजावणार, प्रतोद कोण आणि अन्य मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन …

Read More »

कपिल सिबल यांचा आरोप, एकनाथ शिंदे बंड करणार हे राज्यपाल कोश्यारांनी माहित… कुठल्या अधिकारात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली

शिवसेना कुणाची? १६ आमदारांच्या अपात्रतेचं काय? या सगळ्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीचा दुसरा दिवस असून कपिल सिब्बल हे ठाकरे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद सुरू आहे. आज त्यांनी जेवणानंतरच्या सत्रात एकनाथ शिंदे आणि त्यावेळी राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारींवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे बंड करणार हे त्यावेळी …

Read More »

कपिल सिबल म्हणाले, विधिमंडळाचा गटनेता आणि प्रतोद पक्षाकडून नियुक्त होतो विधिमंडळातील सदस्य पक्षप्रमुख आणि प्रतोद नेमू शकत नाही

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी चालू असून ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पहिल्या दिवशी युक्तीवाद केला. आज दुसऱ्या दिवशीही त्याच प्रकारे कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. यासाठी मुख्य प्रतोदपदी सदस्यांची निवड होण्याचा मुद्दा कळीचा ठरला आहे. …

Read More »