मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशनही नागपूर येथे होत आहे. परंतु हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन दोन महिने जवळपास झाले. मात्र आगामी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असताना या समितीची सातत्याने बैठक पुढे ढकलण्यात …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार, त्यांची मानसिकता ढळली
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. काल चार महिन्यानंतर बुलढाण्यातील चिखली येथील शेतकरी मेळाव्यातही उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून चांगलाच निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »संभाजी राजे यांचा इशारा, तर उठाव होणारच…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेक वेळा केले. त्यातच शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केल्याने संभाजी राजे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यांरींना काढून टाकण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली. मात्र त्यानंतरही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकारने कारवाई केली नसल्यान अद्याप त्यांनी केलेल्या काही …
Read More »संजय राऊत म्हणाले, त्यांना कामाख्या देवीने बोलावलं पण आम्हाला नाही कधी बोलावलं…
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्यांच्या पाठोपाठ भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही आक्षेपार्ह विधान केले. या विधानावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने जोरदार टीका केली. तरीही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपालांबद्दल कोणतीच कारवाई केली नाही. नेमक्याच परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी गुवाहाटीचा दौरा केला. या दौऱ्यावरून उध्दव ठाकरे गटाचे …
Read More »संजय राऊत यांचा खोचक सवाल, महाराष्ट्राचे देव संपले का?
राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेकडून बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यानिमित्त उध्दव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याचा चांगलाच समाचार घेत म्हणाले, मुख्यमंत्री आज नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, ज्याला स्वत:च भविष्य माहित नाही तो आपलं भविष्य ठरविणार
आपला नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले. तोच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल करत म्हणाले की, काल परवा ते स्वत:च भविष्य बघायला हात दाखवायला गेले. आज काय तर म्हणे गुवाहाटीला नवस …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रासाठी काम करणं त्यांच्या मनात कधीच नव्हतं…
चोगले हायस्कूल, बोरीवली येथे महायुथ फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित रोजगार मेळाव्याला आज युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. तरुणांनी सकारात्मक आत्मविश्वास घेऊन प्रत्येक क्षेत्रात काम करावं, यश तुमच्याच हातात आहे. असं म्हणत तरुणांना प्रोत्साहन दिलं. यावेळी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला चालले आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची …
Read More »नवस पूर्ण करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कामाख्या देवी कडक…
राज्यातील सत्तानाट्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवस केला होता. मुख्यमंत्रीपद मिळाल्याने नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान दुपारी त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कामाख्या देवीकडे काय …
Read More »काँग्रेसचा आरोप, जनतेच्या पैशावर मुख्यमंत्री शिंदे व सहकाऱ्यांचे गुवाहाटी पर्यटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा ताफा आलिशान सुविधांसह गुवाहाटीच्या कामाख्या देवीचा नवस फेडण्यास गेला. राज्यातील शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे, बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत सरकारकडे आशेने पाहत आहे आणि शिंदे सरकार मात्र सरकार वाचावे यासाठी देवदर्शनात व्यस्त आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खोचक टीका प्रदेश …
Read More »अजित पवार यांचा सवाल, गुवाहाटीला जाताय, कुणाचा बळी देणार
राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या समर्थक ५० आमदार आणि खासदार घेऊन आसाम राज्यात गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा राज्यभर आहे. त्यावरुन कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात मुख्यमंत्री शिंदे नेमका कुणाचा बळी देणार असा बोचक सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडी …
Read More »
Marathi e-Batmya