राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकऱ्यांना का हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …
Read More »छगन भुजबळ म्हणाले, सध्या दोनच दाढी एक पांढरी दाढी अन् काळी दाढी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढला चिमटा
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आज दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने मंजूर केलेले जीएसटी विधेयक विधानसभेतही मंजूर करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी विधेयक मांडले. त्यावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून चिमटा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली. सत्ताधारी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय, विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी सीआयडी मार्फत चौकशी होणार
काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचा बीडहून मुंबईकडे येताना माडप बोगदा पास केल्यानंतर झालेल्या अपघातात मेटे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने मेटे यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले. यासंपूर्ण …
Read More »विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून येऊनही उच्च शिक्षित आणि समाजकारणात अग्रभागी राहिलेले नेतृत्व म्हणून श्रीमती मुर्मू यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यातील विविध घटकांना …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंनी नाराज मंत्र्यांना केले खुष; स्वत:कडील खात्यांची जबाबदारी “या” मंत्र्यांकडे संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, दिपक केसरकर यांच्यासह आठ जणांकडे सोपविली जबाबदारी
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप जाहिर केले. परंतु शिंदे गटातील अनेक मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांचे वाटप रूचलेले नसल्याने अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये सुरु झाली. त्यातच बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याच्या यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील अतिरिक्त असलेल्या खात्यांचा कारभार नाराज …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, लता दीदींच्या जयंती दिनी संगीत महाविद्यालय सुरू आज झालेल्या बैठकीत मोठी घोषणा
भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरीक, गोविंदांचे केले “दिल खुष” मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणा
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी, गोविंदा आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकार कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे ३ टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेत ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटीचा प्रवास सुविधा देण्याचा निर्णय …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांना त्रास होणार कारण…. शिदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा त्रास होणार
उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. पण त्यांचे पत्र आम्हाला मिळाले. ते सात-आठ पानाचे आहे. ते पत्र बघताना मला वाटले तो अंतिम आठवडा प्रस्ताव आहे अशी कोपरखळी लगावत. त्यांनी लक्षात घ्यावं की आम्हाला सत्तेवर येवून …
Read More »मुंबईसह राज्यभरात सामुहिक राष्ट्रगीत गायन, जिथे असाल त्या ठिकाणी सहभाग राष्ट्रगीताचे समूह गायन, विश्वविक्रमाची एक संधी ! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे या कालावधीत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने; ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात’ सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी …
Read More »अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांना दिला दम, सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि संतोष बांगर यांच्या कृत्यावरून दिला दम
काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदे-फडणवीसचे सरकार सत्तेवर आले. मात्र या सरकारला अद्याप विधीची मान्यता मिळालेली नाही. विश्वासघाताच्या आणि अविश्वासाच्या बळावर हे सरकार उभे राहिले आहे. मात्र या सरकारच्या एका आमदाराकडून हात नाही मोडता आला तर तंगड तोडा असे त्यांच्या समर्थकांना सांगत आहे. तर आणखी एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलला. यावरून …
Read More »
Marathi e-Batmya