राज्यात एकाबाजूला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला घालविले. त्यानंतर भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापनाही केली. मात्र सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अचानक भाजपा श्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचे पालन करणाऱ्या फडणवीसांनी एकनाथ शिंदे …
Read More »आता केंद्रीय यंत्रणांकडून थेट आदित्य ठाकरे टार्गेट आरे वाचवा आंदोलनात लहान मुलांचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मेट्रो-३ च्या आरेतील कार शेडवरून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर आता शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित राज्यातील महाविकास आघाडीला घालवित भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आणले. त्यानंतर पुन्हा एकदा आरेतच कारशेड करण्याचे …
Read More »भविष्यकालीन धोका टाळण्यासाठी उध्दव ठाकरे गटाने उचलले ‘हे’ पाऊल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली कॅव्हेट
बंडखोरीनंतर शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. काही आमदार-खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत आहेत, तर काही आमदार-खासदार उध्दव ठाकरे यांची बाजू घेत असल्याचे दिसून येत आहे. तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरी पाठोपाठ खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याने शिवसेना पक्षाचे अधिकृत असलेले धनुष्य बाण हे चिन्ह देखील शिंदे गटाकडे जाऊ शकते, असे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शौचालयाच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी शासन मदत करेल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सिंगल युज प्लास्टिक बंदी अनिवार्य-मुख्यमंत्री शिंदे
संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त होण्यासाठी यावर्षी शौचालये बांधण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकांनी स्वच्छतेला महत्व देऊन स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी म्हणून राज्यात या मोहीमेची व्याप्ती अधिक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज …
Read More »शिंदे गटाकडून नाव वगळण्याला आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर, खंजीर खुपसण्याला… इतकं प्रेम दाखविण्याची गरज नाही
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेवून भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. परंतु नव्याने राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष आणि बहुमत चाचणी वेळी शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्या गटाने एकमेकांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करत व्हिपच्या विरोधात ठाकरे गटाने …
Read More »समर्थकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; ज्यांच्याकडून मला धोका होता, तो टळला नाव न घेता उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर साधला निशाणा
राज्यातील सत्तां संघर्षाच्या नाट्यानंतर जरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कारभार हाकायला सुरुवात केली. मात्र शिवसेनेतील बंडखोरी आणि एकनाथ शिंदे यांनी या बंडखोरीचे केलेले नेतृत्व हा विषय अजूनही मागे पडलेला नाही. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढपूरात शासकिय महापूजेसाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »शिवसेनेतील बंडावर शरद पवार म्हणाले, आताची परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भाषणामुळे… निवडणूकांसाठी आतापासून तयारी करण्याचे आदेश दिले
राज्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर याबाबत शरद पवार यांनी पहिल्यांच भाष्य करताना म्हणाले की, शिवसेनेत जे बंड झाले. त्या बंडखोरांकडे बंडाचे नेमके कारणच नाही. त्यांनी सुरुवातीला एक कारण दिले. आता वेगळेच कारण सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या बंडाला नेमके कारणच नाही. मात्र शिवसेनेत अशावेळी असलेली परिस्थिती …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ व्हिडिओवरून अजित पवार यांनी साधला निशाणा मी पण फोन केला पण कॅमेरा चालू करायला सांगत नाही
राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर नव्याने राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी या दोघांनी भाजपाच्या नेत्यांची भेट घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीत आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर …
Read More »शरद पवार यांचा खोचक टोला, सत्ता नसल्याने जे अस्वस्थ होते त्यांची आता… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला टोला
राज्यातील सत्तातंर नाट्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. शरद पवार हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील काही काळ सत्ता नसल्याने जे कोणी अस्वस्थ होते. आता सत्ता आल्याने त्यांच्यातील अस्वस्थता कमी झाली असेल असा खोचक टोला …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला… दिड तास पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे अनं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा
शिवसेनेत बंडखोरी करत ५० आमदारांच्या समर्थनाच्या आधारे भाजपाच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीसाठी गेले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज भेट झाली. पंतप्रधानांनी जवळपास दिड तासांचा …
Read More »
Marathi e-Batmya