Tag Archives: election

सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या पहिल्या २० उमेदवारांच्या यादीत या उमेदवारांना संधी प्रकाश यलगुलवार यांच्या सुनेला, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रतिक्षा प्रविण निकाळजे यांना पुन्हा उमेदवारी

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस जय्यत तयारीनिशी उतरत आहे. आज सोलापूर महानगरपालिकेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची घोषणा, मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार समविचारी पक्षांना सोबत घेऊ, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांना मुंबईकर धडा शिकतील – खासदार वर्षा गायकवाड

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या अशी कार्यकर्त्यांची भावना आहे म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. मुंबई काँग्रेसच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटीची बैठक आज पार पडली. …

Read More »

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाठवला प्रस्ताव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाच्या कार्यालयात …

Read More »

बिहारच्या निवडणूकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तान आणि काँग्रेसवर केली टीका ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरली नाही

काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला की, पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होत असताना पक्षाच्या ‘राजघराण्या’ची झोप उडाली असून, पाकिस्तान आणि काँग्रेसचे दोन्ही नामदार अद्याप ऑपरेशन सिंदूरमधून सावरलेले नाहीत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज, भारत दहशतवाद्यांना त्यांच्याच लपलेल्या ठिकाणी शोधून काढत आहे. अलिकडेच आम्ही ऑपरेशन सिंदूर चालवले. आम्ही आमची …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देत, संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिली भेट

एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे, असेही यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा भाजपा डाव भाजपा सरकार फक्त लाडके उद्योगपती व कंत्राटदारांचे

निवडणुका आल्या की भारतीय जनता पक्ष जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवत असते. लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपा समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणातही भाजपा द्वेषाचे विष कालवत आहे. भाजपाच्या कटेंगे, बटेंगे, एक है तो सेफ है, अशा विषारी प्रचाराला बळू पडू नका, …

Read More »

तेज प्रताप यादव यांचा निर्धार, परत जाण्यापेक्षा मृत्यू निवडेन लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत परत जाण्यास नकार

बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलात (राजद) परतण्याची कोणतीही शक्यता फेटाळून लावली आणि ते म्हणाले की ते त्यांचे वडील लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षात “परत जाण्यापेक्षा मृत्यू निवडेन. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, जनशक्ती जनता दल (जेजेडी) चे प्रमुख असलेले तेजप्रताप यादव म्हणाले की, ते सत्तेने …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, तक्रार करण्यासारखे काही घडलेले नाही इंडिया आघाडीत मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही

निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाने दिली माहिती

राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या …

Read More »

छगन भुजबळ यांचे आवाहन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुढे न्या

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयार असायला हवे. या काळात आपल्यावर अनेक हल्ले होतील मात्र न घाबरता न डगमगता आपल्याला त्यावर प्रतिहल्ला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी …

Read More »