Tag Archives: farmers

मुहूर्त पाहून द्राक्षबागेच्या छाटण्या घेणे कितपत योग्य ? द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी विचार करावा असा अभिजित झांबरे यांचा लेख

सध्या द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची द्राक्षबागेच्या आगाप तसेच ऑक्टोबर पीक छाटणी घेण्याच्या दृष्टीने लगबग सुरु झाली आहे. परंतु ही सर्व तयारी करीत असताना आपल्याकडील बऱ्याच शेतकऱ्यांचा मुहूर्त पाहून छाटण्या घेण्यावरच अधिकत्तर भर असलेला दिसून येतो. आता मुहूर्त पाहून छाटण्या घेणे हा ज्याचा-त्याचा श्रध्देचा भाग आहे. याबाबत कोणतीही टीका-टिप्पणी या ठिकाणी करायची नाही. …

Read More »

द्राक्ष हंगामाचं बिगुल वाजलंय, शेतकऱ्यांनो सावध रहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या सुरक्षतेसाठी आवाहन करणारा अभिजित झांबरे यांचा लेख

साधारण मे, २०११ सालची गोष्ट असावी, तासगाव तालुक्यातील बिरणवाडी या गावातील द्राक्षउत्पादक शेतकरी कै.निवास महादेव मोरे यांच्या कुटुंबासोबत घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. निवास मोरे हे त्यांच्या द्राक्षशेतीत काबाडकष्ट करुन आपल्या संसाराचा गाडा हाकीत होते. तसा त्यांचा कोणाशी वैरभाव नव्हता, त्यामुळे परिसरात एक चांगलं व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. एके …

Read More »

सरकार रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहत आहे का ? विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सवाल

नागपूर : प्रतिनिधी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला आज केला. राज्यात सुरू असलेल्या दुधाच्या …

Read More »

अखेर खेडचा सेझ रद्द मुख्यमंत्र्यांकडून जमिन हस्तांतरण शुल्क माफ : स्थानिक शेतकऱ्यांकडून सत्कार

मुंबई : प्रतिनिधी ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे,त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये अशीच शासनाची भुमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिल्याचे सांगत पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर-खेड मधील निमगांव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावातील सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र रद्द केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

दूधप्रश्नी सरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मागण्यांवर ठाम

मुंबई : प्रतिनिधी दूध प्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी कशाप्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर प्रस्ताव द्यावा अशी विनंती संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास पुढे चर्चा केली जाईल अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले …

Read More »

कर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख आता १४ एप्रिलपर्यंत वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे सहकार मंत्री देशमुखांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी  अशा शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले. तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही …

Read More »

राज्य सरकारचे आदेश असतानाही तूर नाकारण्याच्या घटना शेतकऱ्यांनी तूर जाळून केला निषेध

औरंगाबाद : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा घोळ गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरु आहे. खरेदीची मर्यादा आणि दरामधील तफावत यामुळे शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर खडके उडत आहेत. शुक्रवारी  औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावर दहा शेतकऱ्यांनी आणलेली तूर चाळण न करता रिजेक्‍ट करण्यात आली. त्यामुळे संतप्त …

Read More »

बोंड अळी, ओखी वादळ नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे मागणी राज्य सरकारने मागितले केंद्राकडे २ हजार ४२५ कोटी रूपये

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कापूसावरील बोंड अळी आणि ओखी वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने केंद्राकडे मदत मागण्यात आल्याची …

Read More »

वीज बील न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार वीज मंत्र्यांच्या उत्तराच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर वीजच्या रकमेची थकबाकी आहे. मात्र काही वीज बीलांच्या रकमेत तांत्रिक कारणामुळे अवाच्या सव्वा वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३ ते ५ हजार रूपये भरावे असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून जे शेतकरी सांगितलेली रक्कमही भरणार नाहीत. त्यांना वीज पुरवठा करणारे रोहीत यंत्र आणि वीज …

Read More »

विदर्भात दुष्काळ जाहीर करा विरोधकांसह सत्ताधारी बाकावरील आमदारांची मागणी: कामकाज तहकूब

नागपूर : प्रतिनिधी विदर्भातील ६५ टक्के धान शेतींला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तर १० टक्के जमिनीवर पेरणीच झालेली नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याने त्या भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदीया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर …

Read More »