दूधप्रश्नी सरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मागण्यांवर ठाम

मुंबई : प्रतिनिधी

दूध प्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी कशाप्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर प्रस्ताव द्यावा अशी विनंती संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास पुढे चर्चा केली जाईल अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले स्पष्ट केले.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने दूध दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकारच्यावतीने रविवारी (ता.६) मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत चर्चेसाठी निरोप देण्यात आला होता. त्यानुसार काल

(ता.७) रोजी दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. संघर्ष समितीने चर्चेच्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. मात्र, दूध प्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी सरकार कशा प्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चे अगोदर सरकारने प्रस्ताव द्यावा अशी विनंती संघर्ष समितीने केली आहे. सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास नक्की चर्चा करू अशी भूमिका संघर्ष समितीने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

प्रस्तावाशिवाय चर्चा निष्फळ ठरते हा अनुभव पाहता समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्या शिवाय व मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत ठोस कृती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही. दुधाला सरकारने हमी दिल्याप्रमाणे प्रति लिटर २७ रुपये दर व दूध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पर्यायी दूध धोरण या मागण्या संपूर्णपणे मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही. आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमातच कर्जमाफीबाबत कृषी मंत्री भरणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र मौन

मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. त्यानंतर कर्जमाफी घोषणेची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *