कर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख आता १४ एप्रिलपर्यंत वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे सहकार मंत्री देशमुखांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी  अशा शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.

तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही एकवेळ समझोता (वन टाईम सेंटलमेट) योजनेंतर्गतही पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत ३६.९५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर १४ हजार ५६४ कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.

About Editor

Check Also

दिल्लीत महाराष्ट्र, कृषी विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान महाराष्ट्राच्या उल्लेखनीय कामगिरीचा केंद्राकडून गौरव; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत महाराष्ट्राने (कृषी विभाग) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *