Tag Archives: hindi language

आमदार रईस शेख यांची मागणी, पहिलीपासून हिंदीचे विद्यार्थ्यांवर दडपण नको ५ जुलैच्या मराठी भाषेच्या मोर्चात सहभागी होण्याबाबत निर्णय घेणार

इयत्ता पहिली ते चौथी पर्यंच्या विद्यार्थ्यांना दोनपेक्षा अधिक भाषा शिकणे दडपणाचे आहे, असा तज्ज्ञांचा दावा असून महायुती सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेची केलेली सक्ती गैर आहे. त्याला विरोध असून ५ जुलै रोजी मराठीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, …

Read More »

शरद पवार यांचा विरोध, पहिली ते चौथी इयत्तेत हिंदी भाषा सक्ती करणं योग्य नाही हिंदीची सक्ती नको, महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेश नाही

पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. सरकारने तसा हट्ट करू नये. आज देशातील ५५ टक्के लोक हिंदी बोलतात ती सुसंवादाची भाषा असू शकते. हिंदीबद्दल महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेष नाही पण म्हणून हिंदीची सक्ती नको अशी परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर …

Read More »

आशिष शेलार यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही, तर पुर्वीपासून पाचवी ते आठवी पर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली व अन्य पर्याय उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा या अवाजवी, अतार्किक …

Read More »

राज ठाकरे यांचा सरकारला इशारा, हिंदी सक्ती हा महाराष्ट्रद्रोहच हिंदी भाषा कशी शिकवता ते बघतोच!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत त्रिसुत्री भाषा धोरणानुसार हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात करण्यात आली. मात्र त्यास सर्वच विरोधी पक्षियांनी विरोध केल्यानंतर आता राज्य सरकारने हिंदी भाषेला भारतीय भाषेचा पर्याय ठेवला आहे. मात्र त्यास २० विद्यार्थ्यांची अट कायम ठेवली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्याने शासन निर्णय जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, त्रिभाषा असताना द्विभाषा सुत्र स्विकारू शकत नाही आता पहिलीपासून हिंदी सक्तीची नाही पण अन्य भाषेचा पर्याय

राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रानुसार पहिली ते पाचवीपर्यंत मराठी-इंग्रजीसह तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. विद्यार्थी आता तिसरी भाषा म्हणून हिंदी व्यतिरिक्त इतर भारतीय भाषा निवडू शकतात. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असेल. विभागाच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा हाणून पाडू

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री …

Read More »

अमोल मातेले यांची सरनाईक यांच्यावर टीका, ते विधान दुर्दैवी आणि अपमानजनक हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाल्याचे विधानावरून केली टीका

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे” असे विधान करून केवळ मराठी भाषेचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा अपमान केला आहे. हे विधान निषेधार्ह, दिशाभूल करणारे आणि संपूर्ण मराठी समाजाच्या भावना दुखावणारे आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष …

Read More »

हिंदी भाषेवरून राज्य सरकारची माघारः आता अनिवार्य नाही तर ऐच्छिक राहणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी …

Read More »

संजय निरूपम यांची स्पष्टोक्ती, वक्फ आणि मंदीराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न चुकीचा विचारांपासून दूर गेलाला उबाठा पक्षच कृत्रिम झालाय

बाळसाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेला आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणारा उबाठा पक्षच कृत्रिम झालाय, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय निरुपम पुढे म्हणाले की, उबाठा गटाने बाळासाहेबांचे भाषण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धीमत्ता) वापर करुन दाखवले. पण खरतर उबाठा …

Read More »

राज ठाकरे यांना न विचारताच एनईपी आणि हिंदीचा निर्णय; पाठिंबा काढून घेणार का? पाडव्याच्या सभेत निर्णय जाहिर भूमिका मांडूनही राज ठाकरे यांना भाजपाने दाखवला ठेंगा

देशातील अनेक राज्यांमध्ये त्रि-सुत्री भाषेचे तत्व मांडत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात एनईपी धोरण केंद्र सरकार अर्थात भाजपाने मांडले. या भाषिक त्री सुत्रीला हिंदी भाषिक राज्ये वगळता सर्वच दक्षिणेतील राज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र केंद्र सरकारकडून आर्टीफिशियल असलेली हिंदी भाषा बिगर हिंदी राज्यांवर लादण्याची आग्रही भूमिका स्विकारली आहे. …

Read More »