Tag Archives: mahavikas aghadi

नाना पटोले यांचा आरोप, युती सरकार शेतकरी, कामगार व गरीबांचे नाही तर श्रीमंतांचे सरकार सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली, विदर्भ व मराठवाड्याच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा नाही

विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही. गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे ती लाडका उद्योगपती लुटत आहे. …

Read More »

अमित शाह यांच्या वक्तव्याचे राज्याच्या विधिमंडळातही पडसादः मविआचा सभात्याग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात वॉक आऊट

संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उद्गार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. यावेळी विधान परिदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की, सभागृहात …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेने बहुमत दिले का? आजच्या कामकाजावर काँग्रेसचा बहिष्कार

राज्यात महायुती सरकारचे बहुमतात सरकार आले. या सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळाले का असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधकांनी पायऱ्यांवर परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर कामकाज …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, बीड व परभणीच्या घटनांवर राज्यातील जनतेत तीव्र संताप… विरोधकांकडून ईव्हीएम व बीड, परभणीतील मुद्द्यांवर विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीड मधील घटनांचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. …

Read More »

शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे सरकार सत्तेवर सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार

शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत प्रथेप्रमाणे राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे शिवसेना उबाठाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली. नागपूरात उद्या सोमवारपासून …

Read More »

महाराष्ट्रात भाजपाचे ऑपरेशन कमळ? चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, अनेक असंतुष्ट लोक आमच्या संपर्कात आहेत

महाविकास आघाडीला (मविआ) दणका देण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. मविआचे अनेक खासदार आणि आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे अनेक खासदार-आमदार असंतुष्ट आहेत, ते आपल्यासमोर अस्वस्थता व्यक्त करत आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदीः उपाध्यक्ष पद मविआकडे? अध्यक्षपदासाठी एकट्या नार्वेकरांचा अर्ज

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर रितसर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे-अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीनंतर आयोजित विधानसभेचे विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. निवडणूकीत महायुतीला २३१ जागा मिळाल्याने निर्विवाद बहुमत महायुतीच्या बाजून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपदीही भाजपाकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. …

Read More »

शरद पवार यांचा सवाल, कमी मते मिळवणाऱ्या पक्षाला ४१ तर ७२ लाख वाल्याला फक्त १० जागा विधानसभा निवडणुकीतील मतांबाबत व्यक्त केले आश्चर्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आज कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परिषदेतून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना पहिल्यांदाच मतदानाच्या आकडेवरून शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. निवडणुकीत …

Read More »

राज्यघटनेचे नाव घेणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना घटनेच्या शिल्पकाराचाच विसर विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांना अभिवादन तर घटनेच्या शिल्पकाराकडे पाठ

मागील १५ वर्षापासून विशेषतः २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपासून सातत्याने सत्ताधारी भाजपाचे नेते आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वच घटक पक्षाकडून राज्यघटनेचा आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत तर प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक वाक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष …

Read More »

अबु आझमी आणि रईस शेख यांनी घेतली शपथः मविआतून बाहेर? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कारण पुढे करत दिले संकेत

राज्यातील महायुती सरकारला मिळालेल्या संशयातीत विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर मतदान चोर अशी टीका करत सत्ताधाऱ्यांबरोबर आमदारकीची शपथ घेण्याऐवजी उद्या रविवारी शपथ घेणार घेणार असल्याची घोषणा केली. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेख यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे समाजवादी …

Read More »