Breaking News

Tag Archives: mallikarjun kharge

काँग्रेसच्या बिगर गांधी अध्यक्ष पदासाठी सोमवारी मतदान राज्यभरातील ५६१ मतदार बजावणार आपला मतदानाचा हक्क

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. विशेष म्हणजे २४ वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेसला बिगर गांधी घराण्याच्या अध्यक्ष पदासाठी मतदान सोमवारी मतदान होणार …

Read More »

मल्लिकार्जुन खर्गे यांना जबरदस्त आव्हान ; शशी थरुर यांना महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या सोमवारी म्हणजे १७ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. या निवडणुकीत गांधी नेहरु परिवाराचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांना ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी जबरदस्त आव्हान दिले. पी. चिदंबरम, सैफुद्दिन सोज, ए.के.ॲंथनी यांच्या सह अनेक नेत्यांच्या मुलांनी शशी थरुर यांना पाठिंबा दिला असून माजी केंद्रीय मंत्री …

Read More »

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान राज्यातील ५६५ प्रदेश प्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जेष्ठ नेते व माजी मंत्री मल्लिकार्जून खर्गे व माजी मंत्री खासदार डॉ. शशी थरूर यांच्यात लढत होत असून येत्या १७ ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पथकाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन पाहणी केली. काँग्रेस …

Read More »

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; एका महिन्यानंतर निवडणूक ‘या’ तारखेला मतमोजणी ज्येष्ठ नेत्यांनी केले जाहीर

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून आणि निवडणूकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निर्णय प्रक्रियेवर पक्षातंर्गत काही नेत्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यातच पक्षातील २३ नेत्यांनी वेगळी भूमिका स्विकारल्यानंतर त्यातील काही जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ …

Read More »

ईडी कारवाईनंतर संजय राऊत यांचे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र, वाचा पत्र ईडी कोठडीतूनच लिहिले पत्र

पत्रावाला चाळप्रकरणी ईडीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने कारवाई करत अटक केली. तसेच त्यांना विशेष न्यायालयानेही दुसऱ्यांदा ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर आज ईडी कोठडीतूनच संजय राऊत यांनी काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिल्याची माहिती पुढे आली आहे. या पत्रात ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी काँग्रेस …

Read More »

आरक्षणप्रश्नी भाजपा नव्हे तर काँग्रेसचा नेता करतोय शिष्टाई आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र

नवी दिल्ली : प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर पुन्हा ओबीसींना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा भाजपाच्या अनेक नेत्यांनी करत चक्काजाम आंदोलन करत आहे. मात्र याप्रश्नी भाजपाचा एकही नेता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर दिल्लीत एकाही केंद्रीय मंत्र्याला किंवा भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला भेटायला गेला नाही. मात्र …

Read More »

… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द खरे ठरतायत : मल्लीकार्जून खरगे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसाच देशाला तारणार : नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र एक करून देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. परंतु आज लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. विद्यमान सत्ताधा-यांकडून लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून राज्य कारभार सुरु आहे. मागील काही वर्षात दलित, अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक …

Read More »

दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच काँग्रेस सरचिटणीस मल्लिकार्जून खर्गे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी दलित, आदिवासी, मागासवर्गींयांना असलेला भाजपाचा विरोध हा त्यांच्या डीएनएमध्येच आहे. त्याच मानसिकतेतून आरक्षण संपुष्टात आणण्यास त्यांनी सुरुवात केली. परंतु काँग्रेस पक्ष मागासर्गीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून भाजपाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी कोणताही संघर्ष करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे …

Read More »

संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे आवाहन

नागपूरः प्रतिनिधी संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा डाव हाणून पाडण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. …

Read More »

भाजपाच्या सभात्यागावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले रिकाम्या बाकड्यांशी काय बोलणार अभिमान वाटणारा महाराष्ट्र घडविण्याचे आवाहन

मुंबईः विशेष प्रतिनिधी मी सभागृहात येताना माझ्यावर दडपण होते. मी मैदानातील माणूस आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर इथल्यापेक्षा मैदानच बरे असे वाटायला लागले. विरोधी बाकावरील सगळ्यांनीच सभात्याग केल्याने मी जे आहे ते समोरासमोर खेळणारा माणूस आहे. या रिकाम्या बाकड्यांशी मी काय सामना करणार असा सवाल करत त्या बाकड्यांशी खेळणार नसल्याचे मुख्यमंत्री …

Read More »