Breaking News

Tag Archives: maratha reservation

मराठा समाजातील असंतोष दूर करण्यासाठी राज्य सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय साडेतीन तासाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे …

Read More »

आरक्षण अंतरिम स्थगिती विरोधात सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल राज्य सरकारची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर न्यायालयाच्या याच निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने पुन्हा विनंती अर्ज आज दाखल केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकाल जर रद्द केला तर राज्यातील मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षणाचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. मराठा आऱक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने …

Read More »

सरकारचा मोठा निर्णय : पोलिस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा बाजूला काढणार गृहमंत्री अनिल देशमुख ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी राज्यात पोलिसांच्या १२ हजार ५०० जागा भरण्यात येणार आहेत. मात्र या जागा भरताना मराठा समाजाला आरक्षणातर्गत येणाऱ्या १३ टक्के जागा वेगळ्या काढणार असून त्यातील कायदेशीर बाबी जागा भरून मराठा समाजातून त्या भरणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटरवरून दिली. आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना दिली गुड न्युज तर मराठा समाजाला केले मोर्चे न काढण्याचे आवाहन भाजपाला मात्र इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यत नियंत्रणात असलेली कोरोनाची संख्या पुन्हा वाढत असून जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार दुसरी लाट येणार आहे का? कि आली आहे हे आताच सांगणे अवघड आहे. मात्र या विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण महाराष्ट्रात चांगलाच वाढत आहे. त्यातच आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आता पुन्हा आपल्यासमोर आला आहे. या …

Read More »

मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही सर्वांना विश्वास घेऊन ही न्यायालयीन लढाई जिंकणारच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. …

Read More »

धक्कादायक व आश्चर्यकारक : आदेश निरस्त करण्यासाठी सरन्यायाधिशांकडे अर्ज करणार मराठा आरक्षण मंत्री समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश अनपेक्षित, धक्कादायक व आश्चर्यकारक असून सोमवारी सरन्यायाधिशांकडे अर्ज करून हा अंतरिम आदेश निरस्त करण्याची विनंती केली जाणार आहे. गुरूवारी दुपारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, त्यावेळी पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक …

Read More »

संभाजी ब्रिगेड म्हणते आम्हाला ओबीसीत समाविष्ट करा महासचिव सौरभ खेडेकरांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाने नैराश्यात न जाता गायकवाड आयोगाच्या अहवालाचा आधार घेत महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करू आणि ओबीसी समाजात समाविष्ट करण्याची मागणी लावून धरू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिला. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्ष मराठा …

Read More »

मराठा आरक्षण : न्यायालयाच्या निर्णयावरून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका प्रयत्नांवर पाणी फेरले गेल्याचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील सरकारने केलेल्या सर्व प्रयत्नांवर आजच्या सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरल्या गेले असून विद्यमान सरकारने सर्वांना विश्वासात घेवून कारवाई केली असती तर आरक्षण टिकविता आले असते. पण हे सरकार पहिल्यापासून आरक्षणाबाबत गंभीर नसल्याने ही वेळ आल्याची  टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी ठाकरे …

Read More »

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती, मात्र आरक्षण मिळण्याची आशा मोठ्या खंडपीठासमोर होणार सुणावनी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नसल्याचे सांगत आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. मात्र हा खटला मोठ्या खंडपीठासमोर चालविण्यासाठी वर्ग करण्यात येणार असल्याचा निर्णय दिल्याने मराठा आरक्षणाबाबत आणखी …

Read More »

मुख्यमंत्री, उद्योजक, कारखानदार असणा-या समाजाला मागासवर्गाचे आरक्षण कसे? मराठा समाजाच्या मतांच्या फायदासाठीच आरक्षण: अॅड सदावर्ते

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पी. एस पटवालिया, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. याआधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारची बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर आज विरोधकांची बाजू ऐकून घेतली. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण लागू करणे कसे अयोग्य आहे? …

Read More »