Tag Archives: marathwada

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार

राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

दीड लाख अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक दिवसाचे वेतन देणार मराठवाड्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देणार एक दिवसाचा पगार

राज्यात मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२५ महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची माहिती महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष संतोष ममदापुरे आणि दुर्गा महिला मंच अध्यक्षा …

Read More »

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ओला दुष्काळ जाहिर करा केंद्र सरकारकडून पॅकेज जाहिर घ्या

मराठवाड्यासह राज्याच्या झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. याशिवाय बिहारच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून मदतीचे पॅकेज घ्यावे, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आदेश, पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा तात्काळ उपलब्‍ध करा आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा. आपत्कालीन स्थितीत १०८, १०२ रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत आरोग्य सेवा सुविधा तत्काळ उपलब्ध ठेवाव्यात, असे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन येथे यासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे माहिती, शेतकऱ्यांना सावरू; मदतीसाठी लवकरच योजना • आपत्तीग्रस्तांना सरकारची सढळ मदत • उद्योजक, संस्थांनी सीएसआर फंड द्यावा

पुराने अस्मानी संकटात सोडलेल्या  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, कष्टाने उभारलेले संसार पुन्हा सावरण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून परतल्यानंतर योजना नक्की केली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीचा निर्णय घेऊ, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुंबईत पत्रकारांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्याचा जवळपास अर्धा भाग पूरग्रस्त झाला असून, पूरग्रस्त कुटुंब व …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, शिवसेनेचे सर्व मंत्री करणार पूरग्रस्त भागाचा दौरा शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त मराठवाड्याला मदतीचे ट्रक रवाना

राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या संकटकाळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासाठी महायुतीचे सर्व मंत्री पूरग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून दिलासा देणार असल्याचे सांगितले. आपण स्वतः ही धारशिवचे पालकमंत्री प्रताप …

Read More »

मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याशी फोनवरून साधला संवाद

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे …

Read More »

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छ. संभाजीनगर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथकपणे काम करू

मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषि, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात दिली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. …

Read More »

मराठवाड्यात कुणबी-मराठा किंवा मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहिर

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या लढ्याला आज अखेर यश मिळाले. निझाम राजवटीच्या अखत्यारित असलेल्या मराठवाडयातील मराठा समाजाला कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी असे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाच्या मागणीनुसार अखेर राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार निझाम …

Read More »

१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते ४५ अंशापर्यंत जाण्याचा …

Read More »