Tag Archives: mla

प्रविण दरेकर यांनी दिला खोचक सल्ला, संजय शिरसाटांनी क्षमतेत बोलावे संजय शिरसाट यांच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे विधानावरून सल्ला

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चांगलेच कान टोचले आहेत. संजय शिरसाट यांनी आपल्या क्षमतेत बोलावे, असा सल्ला दरेकर यांनी दिला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज वक्तव्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात चांगले काम …

Read More »

कांदा प्रश्नावरून बच्चू कडू यांचा प्रहार, हे नामर्दाचं सरकार…फक्त ग्राहकांचा विचार करणार केवळ सत्ता टीकविण्यासाठी हे सगळं

नुकतेच राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेल्या दादा भुसे यांनी कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही असे वक्तव्य करत जर कांदा महाग झालाय असं वाटत असेल तर खावू नका असे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यातच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या ४० टक्के शुल्कावरून राज्यात राजकिय …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला २४ तास होण्यापूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांवर कारवाईला सुरूवात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल तर माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ

काल विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाकाळात मृत पावलेल्या लोकांना सोडणार नाही असा गर्भित इशारा ठाकरे गटाला दिला. त्यास २४ तास उलटत नाही तोच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे येत असून त्यांच्यावर मृतांसाठी लागणाऱ्या बँगेच्या …

Read More »

शरद पवार यांच्यावर समाज माध्यमातून टीका करणाऱ्याला भाजपाकडून पायघड्या भाजपाच्या मिडीया सेलच्या सहसंयोजक पदावर नियुक्ती

काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील सटाणा येथे राहणाऱ्या निखिल भामरे यांने समाजमाध्यमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अर्वाच्च भाषेत पण सूचक शब्दात टीका केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून निखिल भामरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांकडून पवार कुटुंबियांची जाहिर माफी मागितली. त्यानंतर भामरे यास जामिनही मंजूर करण्यात आला. …

Read More »

मणिपूरमधील भाजपा आमदाराकडूनच पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह न्युजलाँड्री या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट

साधारणतः दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर मधील हिंचासार काही केल्या शांत होण्याची चिन्हे दिसून येत आहे. अखेर मणिपूरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दट्ट्या दिल्यांनंतर व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा शासित मणिपूरबरोबर काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यांना लक्ष्य करत विरोधकांवरच टीका केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

“जरा जाऊन बघुन येतो” सांगणाऱ्या नेत्याच्या मतदारसंघातून शरद पवार यांच्या दौऱ्याचा झंझावात येवला (नाशिक) येथे राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ शरद पवार फोडणार ;महेश तपासे यांची माहिती...

५ जुलै रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या फुटीरांवर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्याचा नावासह उल्लेख करत म्हणाले, छगन भुजबळ यांचा मला सकाळी फोन आला होता. ते म्हणाले, मी जरा तिकडे (अजित पवारांकडे) जाऊन बघुन येतो, काय नेमकं काय चाललयं ते. पण ते तिकडेच गेले असे …

Read More »

शक्तीप्रदर्शनाच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार यांच्या पाठीशी कोणते आमदार? बहुतांष आमदारांचा अजित पवारांच्या बाजूनं कल

मागील काही महिन्यापासून अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. अखेर त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत २ जुलै रोजी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच अजित …

Read More »

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकूल योजना तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकार मंत्री …

Read More »

‘नियम सारखेच…’ बॅनरबाजीवर बच्चू कडूंचे प्रत्युत्तर, या अज्ञानामुळेच सत्ता जाते… पाषणा येथील बॅनरबॅजीवरून राष्ट्रवादीवर केली टीका

२०१९ साली कर्नाटकातील कोलर येथील जाहिर सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका करताना नरेंद्र मोदींबाबत अपमानकारक वक्तव्या केले. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर बच्चू कडू यांची आमदारकी (विधानसभा सदस्यत्व) रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर काल २५ मार्च रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने …

Read More »

अजित पवार म्हणाले, काहीही जण सकाळी सकाळी टाकतात तर मी कामाला सुरुवात करतो पवारांचा रोख मनसे प्रमुख राज ठाकरेंकडे तर नाही ना चर्चेला सुरुवात

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, राज्यात न आलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवरील स्थगितीवरून राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन ६ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार …

Read More »