Breaking News

Tag Archives: monsoon session

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी, हुकूमशाही ‘जनसुरक्षा विधेयक’ त्वरित मागे घ्या विधेयकावर चर्चा करण्याऐवजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडले

महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ‘जनसुरक्षा अधिनियम, २०२४’ हे विधेयक सादर केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महायुती सरकारचा तीव्र निषेध करत असून लोकशाही हक्क तुडवणारे हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटीने केल्याची माहिती राज्य सचिव उदय नारकर यांनी दिली. राज्य सचिव उदय नारकर म्हणाले की, जनतेने निवडून दिलेल्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट, तुमच्याकडचीही मतं आणली, पुढे आम्हीच सत्तेत महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार

विधान परिषदेच्या निवडणूकीनिमित्ताने १२ उमेदवार उभा करत महाविकास आघाडीचे मोठे मोठे नेते म्हणत होते की, आमचा १२ उमेदवार निवडूण येणार म्हणून, पण या निवडणूकीत आम्हाला मिळणारी मते आम्ही मिळवलीच पण महाविकास आघाडीची मतंही आम्ही खेचून घेत ती आमच्याकडे आणली. त्यामुळे आता जी परिस्थिती आज दिसून आली. तीच परिस्थिती येणाऱ्या आगामी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल, राही सरनोबत आणि शहीद सूद वर सरकारकडून अन्याय का ? सुवर्ण पदक विजेती राही सरनोबतला वेतन द्या, शहीद सूद कुंटुबियांना मदत करा

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे वडेट्टीवार यांनी राही सरनोबत आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत …

Read More »

क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती

देशाला सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. देशाच्या क्षयरोग मुक्तीच्या लढ्यात महाराष्ट्र राज्यही मागे नाही. राज्यातही क्षयरोग निर्मुलनाबाबत प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने ११ राज्यांमध्ये १८ वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये राज्याचाही समावेश आहे. लस घेण्यासाठी …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकातील हा पुतळा भव्य असल्याने त्यासाठी वेळ लागत आहे. स्मारकाचे हे संपूर्ण काम लवकर पूर्ण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

शंभुराज देसाई यांचा आरोप, शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक अनुपस्थितीत

मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. या बैठकीला अनुपस्थित राहून विरोधी पक्षांना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा, सामाजिक तेढ निर्माण करण्याला अधिक खतपाणी घालायचे असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत केला. सरकारला असहकार्य करण्याची आडमुठी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. मराठा ओबीसीच्या आरक्षणाचा वाद …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, … मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण का दिले नाही? आरक्षण प्रश्नावरील स्वतःचे पाप लपवण्यासाठी महायुती सरकारकडून राजकारण

सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर मराठा आरक्षण प्रश्नावर गुलाल उधळला तो कशासाठी, असा सवाल उपस्थित करून सरकारचा एक मंत्री ओबीसी आंदोलनात जाऊन जाहीरपणे विरोधी भूमिका घेतो. सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावर …

Read More »

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने काँक्रिटीकरण मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबईकरांना दरवर्षी खड्ड्यांतून प्रवास करावा लागू नये यासाठी डांबरीकरणाऐवजी रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेली नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सदस्य प्रसाद लाड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी …

Read More »

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब

विधानसभेचे कामकाज दुपारपर्यंत सुरळीत पार पडल्यानंतर काल रात्री राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या निर्माण झालेल्या राजकिय तिढा सोडविण्यासाठी सर्वपक्षिय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र त्या बैठकीकडे विरोधकांकडून पाठ दाखविण्यात आली. त्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर प्रत्यारोप करत सभागृत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यास विरोधकांकडूनही प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न …

Read More »

मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के जीवीत व वित्तहानी झाली नसल्याची अजित पवार यांची निवेदनाद्वारे विधानसभेत माहिती

राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी …

Read More »