भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर अवलंबून राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राहुल गांधी यांचा पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष भारत आघाडी आणि त्यांच्या सैन्याविरुद्ध पाकिस्तानच्या चुकीच्या मोहिमेला बळी पडले आहेत आणि ते त्यांचे प्रवक्ते बनले आहेत. ऑपरेशन सिंदूरवरील काँग्रेसची विधाने पाकिस्तानच्या वक्तव्याशी अगदी साम्य आहेत – अगदी स्वल्पविराम आणि पूर्णविरामांपर्यंत असा पलटवार काँग्रेसवर केला.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा भारत आत्मविश्वासाने आणि ‘आत्मनिर्भरतेने’ भरलेला आहे आणि वेगाने प्रगती करत आहे. पण देशात एक विरोधाभासही दिसून येत आहे – भारत वेगाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, काँग्रेस पाकिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर अवलंबून राहणे सुरूच ठेवत आहे. दुर्दैवाने, काँग्रेस पाकिस्तानकडून मुद्दे आयात करत असल्याची टीकाही यावेळी केली.
पंतप्रधान मोदी यांनी निदर्शनास आणून दिले की, सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर काँग्रेसने लगेच पुरावे मागितले. जेव्हा ते लष्कराला बदनाम करू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी त्यांचा सूर बदलला आणि त्यांच्या कार्यकाळातही त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला. एकाने म्हटले की काँग्रेसने तीन सर्जिकल स्ट्राईक केले, दुसऱ्याने सहा केल्याचा दावा केला आणि तिसऱ्याने म्हटले की त्यांनी १५ सर्जिकल स्ट्राईक केले, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने बालाकोट हवाई हल्ल्यानंतर, काँग्रेसने – अगदी पाकिस्तानप्रमाणेच – छायाचित्रित पुरावे मागण्यास सुरुवात केली. जेव्हा वैमानिक अभिनंदन यांना पकडण्यात आले तेव्हा पाकिस्तानला आनंद होणे स्वाभाविक होते. पण इथेही काँग्रेसमधील काही लोक म्हणत होते की, ‘आता मोदी अडकले आहेत… पाहूया ते अभिनंदन कसे परत आणतात’… अभिनंदन परत आले,’ असे सांगताच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी “मोदी, मोदी” च्या घोषणा दिल्या.
👉राहुल गांधी जी ने उठ कर कहा ट्रम्प
का नाम लेकर बोलिए वो झूठ बोल रहे हैं👉मोदी जी पानी पीने लगे
▪️संसद TV असमंजस में
• राहुल जी को ललकारते हुए दिखा नहीं सकते
• मोदी जी को पानी पीते नहीं दिखा सकते
• तो बिरला जी पर फोकस हो गया pic.twitter.com/IJWYU5ZoIK
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) July 29, 2025
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, २३ एप्रिल रोजी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना चुकून सीमा ओलांडल्यानंतर पाकिस्तानने ताब्यात घेतले तेव्हा काँग्रेसलाही अशीच अपेक्षा होती. तथापि, १४ मे रोजी शॉ त्यांच्या कुटुंबाकडे सुरक्षित परत आल्यावर काँग्रेसचा आनंद अल्पकाळ टिकला अशी टीका केली.
लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट केली होती – की ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या त्यांच्या कृती “अनावश्यक” होत्या आणि केवळ पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले होते. “म्हणूनच आम्ही थांबलो,” असेही सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधारांना शिक्षा करण्याचा भारताचा संकल्प केवळ २२ मिनिटांत पूर्ण झाला, ज्यामुळे देशाच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे दर्शन घडले. लष्कराला हल्ल्याची वेळ आणि ठिकाण निवडण्याचे पूर्ण ऑपरेशनला स्वातंत्र्य देण्यात आले होते असे सांगत त्यानंतर, आमच्या सैन्याने दहशतवाद्यांना अशी शिक्षा दिली की हल्ल्यांमागील सूत्रधारांनाची आता झोप उडाली असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला असे भासले होते की भारत गप्प बसणार नाही. त्यांच्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतरही, भारताने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. “पाकिस्तान काहीही करू शकले नाही,” असे सांगत फक्त २२ मिनिटांत, २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यातील बळींवर अचूक हल्ला करून बदला घेण्यात आल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, भारताने पाकिस्तानच्या आत अशा प्रदेशात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती जिथे यापूर्वी कधीही, मागील युद्धांमध्येही, त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचे धाडस केले नव्हते.
Speaking in the Lok Sabha.
https://t.co/5YMO8qcisH— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2025
पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसला पाठिंबा न मिळाल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली आणि म्हटले की जगाने भारताला पाठिंबा दिला असला तरी, त्याला काँग्रेसकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही अशी टीकाही यावेळी केली.
शेवटी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळाला… तसेच कोणत्याही जागतिक नेत्याने नाही भारताला थांबण्यास सांगितले नाही, पण दुर्दैवाने काँग्रेसने आपल्या सैनिकांच्या शौर्याचे समर्थन केले नाही, “पहलगाम हल्ल्यातील निष्पापांच्या मृत्यूवर राजकारण केल्यावरून काँग्रेसवरही टीका केली.
दरम्यान कोणत्याही जागतिक नेत्यांने भारताला थांबण्यास सांगितले नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले तेव्हा विरोधी बाकावरून पंतप्रधान मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेण्याची सूचना करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे काहीसे वैतागल्याचे दिसून आले आणि त्यांनी लोकसभेत पाण्याचा ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून प्यायला सुरुवात केली.
त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर वरून काँग्रेसच्या काळात घेतलेल्या जून्या निर्णयावर टीका करत पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, काश्मीरचा प्रश्न आदी प्रश्नांवरून काँग्रेस राजवटीवर टीका करण्यास सुरुवात केली.
Marathi e-Batmya