Tag Archives: ncp

कोरोनाच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री ठाकरे , उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले हे आदेश राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

मुंबईः प्रतिनिधी लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असे स्पष्ट आदेश …

Read More »

वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सरकारकडून कठोर निर्णयाचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

औरंगाबादः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरीकांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा कठोर निर्णय घेण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून अनेक जण मास्क वापरण्याचे बंद केले आहे. त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल असा …

Read More »

‘आयत्या बिळावर नागोबा’ चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची मापं काढणे बंद करावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा

सांगलीः प्रतिनिधी ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रिय केला त्यावर ‘आयत्या बिळावर नागोबा’ सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी शरद पवारच्यांवर चुकीचं विधान करणार्‍या चंद्रकांत पाटील …

Read More »

२ वर्षे झाली पुलवामा हल्याच्या चौकशीचे काय? मोदी सरकारने सांगावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या काळात काश्मीर येथील पुलवामा येथे लष्करावर झालेल्या हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाले असून या दोन वर्षात सरकारने काय तपास केला ? चौकशीत कोणती माहिती बाहेर आली? असा सवाल करत चौकशीतील माहिती जनतेला द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पुलवामा …

Read More »

इंग्रजांशी जवळीक वाढवल्याने अहिल्याबाईंनी पेशव्यांना खडसावलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिली करून दिली इतिहासाची आठवण

जेजूरी : प्रतिनिधी अहिल्याबाई होळकर या जागतिक ओळख असणाऱ्या स्त्रीयांपैकी एक होत्या. त्यांची तुलना रशियाची आणि ब्रिटनची राणी यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत   पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांनाही खडसावल्याची इतिहासातील घटनेची आठवण करुन दिली. तसेच अहिल्यादेवी जागतिक स्तरावर छाप सोडणाऱ्या महिला राज्यकर्त्या असल्याचं पवारांनी यावेळी आवर्जून …

Read More »

नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्रामविकासाचे प्रशिक्षण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या असून यातून निवडून आलेले सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामविकासविषयक विविध बाबींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रथमच झाल्या आहेत. त्यामुळे सदस्यांची संख्या …

Read More »

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले घेणार राज्यातील शिक्षकांचा “तास” प्रत्येक जिल्ह्यात ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आणि ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. डिसले यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा यासाठी राज्यातील सर्व …

Read More »

दर तीन महिन्याला तालुकास्तरावर होणार सरपंच सभा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात …

Read More »

… तर लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. परंतु एकतर मोदींना कळत नसेल किंवा कळूनपण लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत आज बोलताना पवारसाहेबांचा उल्लेख केला. …

Read More »

ट्विट करणाऱ्या “त्या” सेलिब्रिटींची आयबी चौकशी करणार काँग्रेसची पक्षाच्या मागणीवर गृहमंत्र्यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे …

Read More »