२ वर्षे झाली पुलवामा हल्याच्या चौकशीचे काय? मोदी सरकारने सांगावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीच्या काळात काश्मीर येथील पुलवामा येथे लष्करावर झालेल्या हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाले असून या दोन वर्षात सरकारने काय तपास केला ? चौकशीत कोणती माहिती बाहेर आली? असा सवाल करत चौकशीतील माहिती जनतेला द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

पुलवामा हल्ल्यात लष्करी जवानांचा बळी गेला. त्यावेळी केद्राने या प्रकरणाचा तपास करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दोन वर्षे झाली तरी अद्याप चौकशीत कोणती माहिती बाहेर आली हे कळायला मार्ग नसल्याचे सांगत केंद्र सरकार कासव गतीने तपास करतय का? असा उपरोधिक प्रश्न त्यांनी यावेळी केला.

ऐन निवडणूकीच्या कालावधीत झालेल्या या हल्ल्याने सबंध देश हादरून गेला. मात्र भाजपाने या मुद्याचाही वापर करून घेत फायदा केला आणि भाजपाला फायदा झाला ही. त्यामुळे पुलवामा घटनेत शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली म्हणून तरी चौकशीत काय मिळाले ते जाहिर करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *